Shiv Jayanti LIVE : राज्यातच शिवजयंतीचा उत्साह; वाचा सगळे अपडेट्स एका क्लिकवर
Shiv Jayanti 2022:आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं जात आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 19 Feb 2022 07:03 AM
पार्श्वभूमी
Shiv Jayanti 2022: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या...More
Shiv Jayanti 2022: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील.आज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. महाराजांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं आणि ते रयतेला अर्पण केलं. महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी होतं. महाराज दूरदृष्टीचे नेते होते, बिकट प्रसंगात त्यांनी प्रसंगी तात्पूरती माघार घेतली, परंतु रयतेला धोका होईल, असा निर्णय घेतला नाही. महाराजांच्या या इतिहासातून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा शिकला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचं हित, जनतेचं कल्य़ाण, डोळ्यासमोर ठेवून, दूरदृष्टीनं घेतला होता, हे आपल्या लक्षात येईल. शिवजयंतीसाठी काय आहे नियमावली?छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आलं आहे. शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली होती. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.इतर महत्वाच्या बातम्याShiv Jayanti 2022: 'दोन-दोन शिवजयंती यापुढे नको! जयंती 19 तारखेला जन्मतारखेनुसारच व्हावी', शिवसेना आमदारShiv Jayanti 2022 : शिवस्मारक आपल्या खासगी जागेत उभारा, अनधिकृतपणे पुतळा बसविणाऱ्यांना पुरुषोत्तम खेडेकर यांनीShiv Jayanti 2022 : शिवजयंतीनिमित्त शिवरायांवर आधारित 'हे' सिनेमे पाहायलाच हवेShivjayanti 2022 : शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर, गृहविभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यताShiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी
Maharashtra News Hingoli : शिव जयंती निमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सार्थ दारव्हेकर आणि शिवार्थ दारव्हेकर या दोन्ही भावंडांनी शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते शिवराज्यभिषेक सोहळा पर्यंतचा मूर्ती आणि चित्ररुपात देखावा मांडला आहे.
शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. स्वराज्यावर अनेक संकटे आली, काही स्वकीयांकडून तर काही परकीयांकडून, पण महाराज कधीही झुकले नाहीत. त्यांचे शौर्य, व्यक्तिमत्व, रयतेच्या हितासाठी केलेले कार्य, दूरदृष्टी याचे दाखले आजही दिले जातात. महाराजांचे वेगळेपण हे की, ते युगपुरुष होते , त्यांची दूरदृष्टी, आदर्श राज्यकारभार, रणनीती याचे आज आपल्यासमोर उदाहरण आहे. त्यांचे आज्ञापत्र वाचले तर शिवराय किती प्रजा दक्ष होते याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, समयसूचकता ही वैशिष्ट्ये आजच्या व्यवस्थापनशास्त्रालाही अभ्यासण्यासारखी आहेत. शिवराय सर्वांचे होते. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी बांधलेल्या सेनेत अठरा पगड जातीचे लोक होते, जात-धर्म-भाषा यांच्या भिंती ओलांडून शिवरायांवर प्रेम करणारे लोक होते. शिवरायांच्या युद्ध नितीमुळे भारतीय लष्कर त्यांना आज आपले दैवत मानते. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करून आपण हा पराक्रमी इतिहास पुढील अनेक पिढ्यांच्या मार्गदर्शनासाठी जतन करण्याचे कामही हाती घेतले आहे. शिवछत्रपतींची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन आमचे सरकार काम करीत आहे आणि पुढे देखील करणार आहे,अशी ग्वाही यानिमित्ताने देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
Narayan Rane LIVE : मी मराठा आहे. आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही कुणाच्या पोटावर मारले नाही : केंद्रीय मंत्री नारायण राणे
Narayan Rane LIVE : मी मराठा आहे. आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही कुणाच्या पोटावर मारले नाही : केंद्रीय मंत्री नारायण राणे https://youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA
Narayan Rane LIVE : मी मराठा आहे. आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही कुणाच्या पोटावर मारले नाही : केंद्रीय मंत्री नारायण राणे
Narayan Rane LIVE : मी मराठा आहे. आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही कुणाच्या पोटावर मारले नाही : केंद्रीय मंत्री नारायण राणे https://youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA
Kolhapur Shiv Jayanti 2022 : कोल्हापुरात छत्रपती घराण्यातील शिवजयंतीला थोड्याच वेळात होणार सुरुवात
Kolhapur Shiv Jayanti 2022 : कोल्हापुरात छत्रपती घराण्यातील शिवजयंतीला थोड्याच वेळात होणार सुरुवात, छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत होणार शिवजन्मोकाळ सोहळा, नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवजन्मोत्सव सोहळा होणार
satara shiv jayanti 2022 : साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात
satara shiv jayanti 2022 : साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. याच निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजा अदालत वाड्यातील शिवाजी राजे यांची मुलगी वृषालीराजे शिवाजीराजे भोसले आणि यांचा मुलगा छत्रपती कौस्तुभ आदित्यराजे भोसले यांच्या हस्ते शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी पोवई नाक्यावर पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. शिवजयंतीमुळे साताऱ्यातील परिसर भगवामय दिसतअसून महिला आणि युवतींचा मोठ्याप्रमाणात शिवजयंती ला सहभाग दिसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. काही वेळातच छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते याच पुतळ्याला अभिषेक घालून त्यांना अभिवादन करणार आहेत. शिवाय राजवाडा परिसरातील गांधी मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजित केला असून याही कार्यक्रमाला उदयनराजे उपस्थित राहणार आहेत.
Shivaji Park shiv jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
Shivaji Park shiv jayanti :शिवजयंतीच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिवरायांना वंदन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो.त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे.सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते.त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Shivneri Shiv Jayanti 2022 Live: शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माच्या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे थोड्या वेळात उपस्थित राहणार. शिवजन्माचा पाळणा या तिघांच्या उपस्थितीत जोजवला जाणार. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे या सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आलीय. त्याचबरोबर साहसी क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिकेही होणार आहेत.
Nagpur Shiv Jayanti 2022: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज नागपुरात उत्साहात साजरी
Nagpur Shiv Jayanti 2022: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज नागपुरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. पहाटेपासून श्री शिवाजी महाराज चौक येथे शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यासाठी सकाळपासून शिवभक्तांची रिघ लागलीय. सकाळी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर ढोल ताशा पथकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर वादन करत मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध पारंपारिक कार्यक्रमांनी ही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
solapur Shiv Jayanti 2022: सोलापुरात देखील शिवजन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. रात्री 12 वाजता सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांनी महाराजांना अभिवादन केलं. महाराजांचा जयघोष करत शेकडो तरुणांनी यावेळी अभिवादन केलं. रात्री 12.30 पर्यंत महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पोलिसांनी आवाहन करून तरुणांना शांततेत घरी परतण्याची विनंती यावेळी केली. सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी चौकात असलेल्या महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत आहे.'
Beed Shiv Jayanti 2022: बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती रोषणाई
Beed Shiv Jayanti 2022: रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव.. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती रोषणाई.. रात्री बरोबर बारा वाजता बिडकरानी मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.. फटाक्यांची आतिषबाजी सोबत लेझर शो यामुळे बीड शहरातील जन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला.. उंच आकाशातून दिसणारे हे दृश्य बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याच्या आहे.. तडफदार पोवाडा आणि त्याच पोवाडा वरती लेझर शो ची रंगसंगती.. यामुळे हा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता..
Shiv Jayanti 2022: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आलं आहे. शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली होती. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.
Shiv Jayanti 2022: तिळावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती, चित्रकार अक्षय मेस्त्री यांची शिवरायांना अनोखी मानवंदना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी तिळावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारून महाराजांना मानवंदना दिली आहे. शिवजयंती निमित्ताने ही सूक्ष्म कलाकृती त्यांनी साकारली आहे. हे सूक्ष्म चित्र साकारायला भिंगाचा वापर केला आहे. गेल्यावर्षी एक सेंटिमीटर आकारात छत्रपती शिवाजी यावेळी शिवजयंतीचे निमित्त साधून महाराज यांचे चित्र साकारून मेस्त्री यांनी चक्क तिळावर छत्रपती अभिवादन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे तिळाच्या दाण्यावर चित्र साकारायला अर्धा तास लागला. त्यासाठी अॅक्रेलिक रंगांचा वापर केला आहे.
Shiv Jayanti LIVE : शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन
Shiv Jayanti LIVE : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनाही वंदन केले असून, शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शब्दात राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवजयंतीनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. महाराजांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं आणि ते रयतेला अर्पण केलं. महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी होतं. महाराज दूरदृष्टीचे नेते होते, बिकट प्रसंगात त्यांनी प्रसंगी तात्पूरती माघार घेतली, परंतु रयतेला धोका होईल, असा निर्णय घेतला नाही. महाराजांच्या या इतिहासातून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा शिकला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचं हित, जनतेचं कल्य़ाण, डोळ्यासमोर ठेवून, दूरदृष्टीनं घेतला होता, हे आपल्या लक्षात येईल. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, धोरणांना, कारभाराला आदर्श मानून काम करत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं आहे. शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शुभेच्छाही त्यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत