शिर्डी : शिर्डी विमानतळावरून आता मुंबई पाठोपाठ हैदराबाद विमान सेवा सुरु झाली आहे. आज शिर्डीहून 72 आसनी विमान 60 प्रवाशांसह हैदराबादला रवाना झालं.
शिर्डी विमानतळाचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यानंतर शिर्डीहून मुंबईच्या दिशेनं पहिलं विमान रवाना झालं. त्यामुळे आता मुंबई ते शिर्डी हा प्रवास आता 40 मिनिटांच्या अंतरावर येऊन पोहोचला.
या विमानसेवेच्या उद्घाटनाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमानंतर शिर्डी ते मुंबईबरोबरच दिल्ली, भोपाळ अशा अनेक शहरांपर्यंत विमानसेवा नियोजित असल्याचं सांगण्यात येत होतं. पण आज दुपारी 4.20 वाजता शिर्डीहून 72 आसनी विमान 60 प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे रवाना झालं.
दरम्यान, मुंबईहून रोज 4 उड्डाणं, तर हैद्राबादहुन रोज 2 उड्डाण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
शिर्डी विमानतळ आजपासून सेवेत, राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण