Shirdi Crime News : शिर्डीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कंडक्टरने पती-पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिर्डी शहरातील आरबीएल चौकात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. एसटी बसच्या कंडक्टरचा पती-पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. दुचाकीस्वाराची दुचाकी बंद पडल्याने रस्त्यावरुन बाजूला घेण्यावरुन एसटी कंडक्टर आणि दुचाकीस्वारामध्ये झाली होती बाचाबाची. यानंतर या बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाल्याचे पाहायला मिळाले. 

Continues below advertisement


दुचाकी बाजूला घेतो असे दुचाकीस्वार सांगत असताना एसटी कंडक्टरकडून मारहाण


दुचाकी बाजूला घेतो असे दुचाकीस्वार सांगत असताना एसटी कंडक्टरकडून मारहाण करण्यात आली आहे. सिन्नर येथील दुचाकीस्वार विलास पवार रा. सिन्नर यांच्या फिर्यादीवरून MH 14 MH 0339 या एसटीचे कंडक्टर पांडुरंग गरकळ यांच्यावर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीत एसटी कंडक्टरची मुजोरी पाहायला मिळाली. 


महत्वाच्या बातम्या:


Navi Mumbai :पैश्यासाठी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा महिलेचा आरोप; मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलवून चोप