Pune Accident :  पुणे (Pune)  शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात असणाऱ्या "टोइट" रेस्टॉरंच्या पार्किंगमध्ये भीषण अपघात घडला आहे. एका मद्यधुंद चालकाने त्याच्या चार चाकी वाहनाने याच रेस्टॉरंटच्या व्हॅले पार्किंग असिस्टंटच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये सत्येंद्र मंडल या पार्किंग असिस्टंटचा मृत्यू झाला आहे. येरवडा पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतला असून तो दारूच्या नशेत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. 

Continues below advertisement


येरवडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल


पुण्यातील ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या वाढत्या प्रकरणांमुळे आता स्थानिकांमध्ये सुद्धा काळजी वाटू लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणीनगर भागात  "टोईट" नावाचे एक रेस्टॉरंट आहे. दुपारच्या सुमारास, मंडल हा याच रेस्टॉरंट मध्ये व्हॅले पार्किंग असिस्टंट म्हणून काम करतो. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास, एका भरधाव वाहनाने या रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये  एंट्री केली. काही समजायच्या आत हे वाहन थेट व्हॅले पार्किंग काउंटर वर जाऊन धडकले. या ठिकाणी असलेल्या असिस्टंटला या वाहनाने उडवलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असिस्टंटला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दारुच्या नशेत असलेल्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. येरवडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 


बार्शी तालुक्यातील पांगरी गावात कार आणि ट्रकची समोरासमोर धडक, पाच जणांचा मृत्यू


सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यातील पांगरी गावात भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लग्नानंतर देवदर्शनासाठी तुळजापूरला निघालेल्या नवदम्पत्याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, नवदम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावात कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. पांगरी गावाजवळील जांभळबेट पुलावर मालट्रक आणि कारचा समोरासमोर झालेल्या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. गौतम कांबळे, जया कांबळे, संजय वाघमारे, सारिका वाघमार यांच्यासह आणखी एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Hinjewadi Accident News: हिंजवडीत पुन्हा RMC ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; आठवड्याभरात दुसरी घटना, कासारसाईला जाऊन फिरून आली अन्...घटनेनं पुणे हळहळलं