'पानी फाउंडेशन'च्या महाश्रमदानासाठी पवारांचे नातू रोहित यांच्या हाती कुदळ-फावडं
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2019 01:48 PM (IST)
वरिष्ठ सांगतील तिथून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. बारामतीत महाश्रमदानासाठी रोहित पवारांनी हाती कुदळ फावडं घेतलं होतं
बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. वरिष्ठ सांगतील तिथून आपण निवडणूक लढवणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. 'पानी फाउंडेशन'च्या वतीने आयोजित महाश्रमदानात रोहित पवारांनी काका अजित पवारांसह हाती कुदळ-फावडं घेतलं. विधानसभेत जाण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर सोशल मीडियातून त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. अलिकडच्या काळात पेड ट्रोलर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे अशा ट्रोलकडे आपण लक्ष देणार नाही, कारण आपल्याला राजकारणात सक्रिय व्हायचं आहे, अशा शब्दात रोहित पवारांनी ट्रोलर्सना गप्प केलं. जे ट्रोल करत आहेत, तेच नंतर आपल्या कामाबद्दल कौतुक करतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. VIDEO | बारामतीत पवार कुटुंबाचं श्रंमदान | बारामती | एबीपी माझा