मुंबई : राज्यात कोरोनामुळं लॉकडाऊन करण्यात आला आहे. यात अनेक व्यावसायिकांचं कंबरडं मोडलं आहे. लॉकडाऊनमुळं राज्यातील हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अडचणीत त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी अशी मागणी करत एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. शरद पवारांनी म्हटलं आहे की, कोविड-१९ ह्या जागतिक महामारीच्या दुसर्या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
हॉटेल, पर्यटन व्यावसायिकांना दिलासा द्या, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
एबीपी माझा वेब टीम | 07 May 2021 07:07 PM (IST)
लॉकडाऊनमुळं राज्यातील हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अडचणीत त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी अशी मागणी करत एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
sharad_pawar_uddhav_thackeray
Published at: 07 May 2021 07:07 PM (IST)