Sharad Pawar Resigns LIVE Updates : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतो; शरद पवारांची मोठी घोषणा

Sharad Pawar Resigns LIVE Updates :

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 May 2023 05:50 PM
Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात


Sharad Pawar Resigns LIVE :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. तसेच अध्यक्षपद स्विकारले असले तरीही कोणते जवाबदारीचे पद स्विकारणार नसल्याची पवारांची घोषणा. 

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवार यांची संध्याकाळी पाच वाजता वाय बी चव्हाण सेंटर इथे पत्रकार परिषद

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवार यांची संध्याकाळी पाच वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद


समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केल्यानंतर आता शरद पवार आपली पुढील भूमिका जाहीर करणार

Sharad Pawar Resigns LIVE : राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या बैठकीत झालेला निर्णय पवारांना सांगितला : प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Resigns LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य समितीच्या बैठकीत झालेला निर्णय शरद पवारांना सांगितला. या प्रस्तावाचा आदर करुन निवृत्तीचा निर्णय मागे घ्या, अशी विनंती आम्ही शरद पवार यांना केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसंच मला विचार करण्यासाठी वेळ द्या, असं उत्तर पवारांनी दिल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Sharad Pawar Resigns LIVE : राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सिल्वर ओकवर दाखल, शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करणार

Sharad Pawar Resigns LIVE : अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, रोहित पवार, अतुल बेनके, सुप्रिया सुळे,जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सोनिया दुहन, नरहरी झिरवाळ, राजेश टोपे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य समितीने राजीनामा नामंजूर केल्यानंतर प्रमुख नेते सिल्वर ओकवर उपस्थित झाले आहेत. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावं, अशी विनंती हे नेते करणार आहेत.

Sharad Pawar Resigns LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, तटकरे, भुजबळ, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल वाय बी सेंटरसाठी रवाना

Sharad Pawar Resigns LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल हे वाय बी सेंटरसाठी रवाना, शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करणार. राष्ट्रवादीच्या सदस्य समितीने शरद पवार यांचा राजीनामा प्रस्ताव फेटाळला.

Sharad Pawar Resigns LIVE : समिती एकमतानं त्यांचा राजीनामा नामंजूर करतेय : प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Resigns LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. समिती एकमतानं त्यांचा राजीनामा नामंजूर करतेय. पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांनी कायम राहावं, अशी समितीची मागणी; राष्ट्रवादी सदस्य समितीचा निर्णय

Sharad Pawar Resigns LIVE : शरद पवारांच्या निर्णयाने स्तब्ध झालो : प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Resigns LIVE : 2 मे च्या दिवशी शरद पवार यांनी राजीनामा दिला होता. त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी पक्षाच्या अध्यक्षपदी दुसऱ्याने राहावं अशी सूचना केली होती. समिती देखील गठित केली होती. मी पक्षाचा उपाध्यक्ष असल्यामुळे मला त्याची जबाबदारी दिली होती. त्यादिवशी ते जे काही बोलले त्यामुळे आम्ही स्तब्ध झालो होतो. ते असा राजीनामा निर्णय जाहीर करतील याची कोणाला कल्पना नव्हती. सर्वांची भावना शरद पवार यांनी अध्यक्ष राहावं अशी होती. चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतर अनेक जण त्यांना भेटून गेले. सर्वांनी मिळून विनंती केली की देशाला तुमची गरज आहे. नाव आणि अधारस्तंभ तुम्हीच आहात. देशात सन्मानित नेता फक्त शरद पवार आहेत. परवा पंजाबला आम्ही गेलो होतो त्यावेळी पंजाबचे शेतकरी भेटले ते म्हणत होते पवारांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम विसरु शकत नाही. मागील 2 ते 3 दिवसांत देशातील दिग्गज नेते शरद पवार यांना भेटून जात होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची भावना पाहायला मिळत होती. पक्षात अनेक मान्यवर राज्यांत आणि देशातील अनेकजण विनंती करत होते की त्यांनी पद सोडू नये.

पार्श्वभूमी

Sharad Pawar Resigns LIVE Updates : राजीनामा देण्याचा शरद पवार यांचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या सदस्य समितीने फेटाळला आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेणाऱ्या समितीच्या बैठकी पार पडली. या शरद पवार यांचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव फेटाळला. शरद पवार यांनी अध्यक्षपदावर कायम राहावं, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान शरद पवार या बैठकीला उपस्थित नाहीत. त्यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले तर समितीला पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे.


अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे?


प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवाळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.


दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह, पदाधिकारी यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.