Sharad Pawar Resignation : मी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार नाही: प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Resignation: लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार, आणि त्या चेहऱ्याच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला किती जागा मिळू शकतात, अशा चर्चा पक्षात रंगू लागल्या आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 May 2023 04:12 PM
Sharad Pawar Resigns : मी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार नाही: प्रफुल्ल पटेल

सध्यातरी मी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही, माझ्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी असून ती मी योग्य पद्धतीने पार पाडेन असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ नये, त्यांनी धीर ठेवावा असंही ते म्हणाले. आमचा पक्ष एक आहे, एकच राहणार असं ते म्हणाले. 

Mumbai News: शरद पवार आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून समजूत काढणार

Mumbai News: दरम्यान, YB सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांनी बोलावलं आहे. शरद पवार त्यांच्याशी चर्चा करून समजूत काढणार आहेत...

Prashant Patil: राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांचा आपल्या पदाचा राजीनामा

Prashant Patil: राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांचा आपल्या पदाचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे  सुपूर्द केला. शरद पवार यांनीच अध्यक्ष राहावं ही पाटील यांंनी ही इच्छा व्यक्त केला. 

Sharad Pawar: सिल्वर ओकला चार वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक,जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल राहणार उपस्थित‌

Sharad Pawar: सिल्वर ओकला चार वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.  जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित‌ राहणार  आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे 

Vasai News: वसईतील पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

Vasai News: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल घेतलेल्या राजकारणातून निवृत्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. वसई विरारमधील राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पञ लिहून, शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला नाही. तर सर्व पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देतील असा इशारा दिला आहे. तर काही कार्यकर्त्यांनी स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा इशारा ही दिला आहे.

Jayant Patil :  आजच्या बैठकीला जयंत पाटलांना ‌निमंत्रणच‌ नाही; शरद पवारांच्या फोननंतर जयंत पाटील मुंबईत येणार, सूत्रांची माहिती

Jayant Patil :  वाय बीच्या बैठकीला जयंत पाटलांना ‌निमंत्रण न मिळाल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार यांनी जयंत‌ पाटील यांना फोन केला.   पवारांच्या फोननंतर जयंत पाटील मुंबईत येणार आहे 

Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. 

Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज? मुंबईत समितीची बैठक जयंत पाटील मात्र पुण्यात

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.  शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक सुरु आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीला न जाता पुण्यातील एका कार्यक्रमाला गेले आहेत. ज्यांना पक्ष चालवायचा आहे त्यांना चालवू द्या असे काल जयंत पाटील म्हचले होते. शरद पवारांच्या भुमिकेवर निर्णय घेण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक सुरू आहे मात्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील बैठकीच्या बाहेर आहेत. 

Jayant Patil: मी राजीनामा दिलेला नाही, जयंत पाटील यांची एबीपी माझाला माहिती

Jayant Patil:  जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही. जयंत पाटील यांनी  एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. 

Jitendra Awhad:  जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाण्यातील राष्ट्रवादीच्य पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Jitendra Awhad:  जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाण्यातील राष्ट्रवादीच्य पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी राजीनामे दिले आहेत. जयंत पाटलांकडे हे राजीनामे पाठवण्यात आले आहेत . जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी काही करून राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

Parali News: परळीत अजिय पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर

Parali News: परळी शहरातील नगर परिषद रोड परिसरात माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरवर  खा. शरद पवार, सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. धनंजय मुंडे, परळी नगर परिषदचे माजी गटनेते वाल्मिक आणा कराड यांचे फोटो देखील आहेत. असे बॅनर परळी वैजनाथ नगर परिषदचे माजी नगर सेवक जाबेर खान पठाण यांनी लावले आहेत. बॅनरमुळे शहरात चर्चा होत आहे. 

Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादीच्या 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा 

Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादीच्या 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा  झाली.  शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार  यांच्या बैठकीत पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला. 26  एप्रिल रोजी बैठक झाली

Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू, सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू  झाली आहे  बैठकीत सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे

Sharad Pawar Resignation: केरळ राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष पी सी चाको पवारांच्या भेटीला


Sharad Pawar Resignation: केरळ राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष पी सी चाको पवारांच्या भेटीला वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले आहेत 

Sharad Pawar: अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी बनवलेल्या कमिटीची साडेअकरा वाजता बैठक

Sharad Pawar: अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी बनवलेल्या कमिटीची साडेअकरा वाजता बैठक वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे.  समितीमधील बहुतेक सदस्य बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे  

Sharad Pawar Resignation Live Updates: अध्यक्षपदासाठी शरद पवारांनी पक्षासमोर दोन नावं ठेवली, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा

Sharad Pawar Resignation Live Updates: पवारांनी अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल असे दोन पर्याय ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आणि म्हणूनच, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका, त्यानंतर लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार, आणि त्या चेहऱ्याच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला किती जागा मिळू शकतात, अशा नानाविध चर्चा पक्षात रंगू लागल्या आहेत.  

Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सिद्धिविनायकाला साकडं


Sharad Pawar Resignation:  शरद पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा म्हणून, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सिद्धिविनायकाला साकडं घातले आहे. 

Pune Sharad Pawar Resign News:  पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून बॅनरबाजी. शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती

Pune Sharad Pawar Resign News:  पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची बॅनर मार्फत विनंती साहेब निवृत्त पदाधिकारी होत असतात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे" "केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे साहेब, कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा" अशा आशयाचे  बॅनर लावले आहेत . राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष समीर उत्तरकर यांनी केली आहे

शरद पवारांचं मुळगाव असलेल्या साताऱ्याच्या नांदवळमध्ये पवारांच्या निर्णयावर नाराजीचा सूर, ग्रामदैवताला ग्रामस्थांचं साकडं

Sharad Pawat Satara News:  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल घेतलेल्या राजकारणातून निवृत्त होत असलेली असल्याबाबतची घेतलेला निर्णय यांनी जाहीर केले आणि राजकारणात मोठा भूकंप झाला. शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या नेते, कार्यकर्ते भाऊक झाले.आणि संपूर्ण राज्यात पवारांच्या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला. अनेकजण ढसा-ढसासा रडत होते. तर अनेक जणांच्या भावना या बाबतचा तीव्र होताना पाहायला मिळाल्या. आसे आसताना तीकडे पवारांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातील नांदवळ या गावात तर चक्क देवाला साकडे घातले गेले. पवार कुटुंबियांचं ग्रामदैवत असलेल्या  मंदिर म्हणजे म्हातोबा जोगुबाई मंदिरात  ग्रामस्थांनी साकडे घालून देवाला अभिषेक घातला. आणि पवार साहेबांनी घेतलेला निर्णय बदलावा अशी त्यांना देवाने बुद्धी  द्यावी असे साकडे घातले. 

पार्श्वभूमी

Sharad Pawar Resignation: पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजलीये.. नवा अध्यक्ष कोण, नवे प्रदेशाध्यक्षही नेमणार का?, जिल्हा स्तरावरील समीकरणं कशी बदलणार? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, पवारांनी अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल असे दोन पर्याय ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आणि म्हणूनच, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका, त्यानंतर लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार, आणि त्या चेहऱ्याच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला किती जागा मिळू शकतात, अशा नानाविध चर्चा पक्षात रंगू लागल्या आहेत.  


पक्षात भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं म्हणत शरद पवारांनी पाच दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिली होती पण, त्याचीच सुरुवात स्वता: पासून करतील असं कुणालाही वाटलं नसेल. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि पवारांनी भाकरी फिरवली नाही तर तवाच  फिरवला,  अशी भावना अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केली.


पवारांच्या निर्णयानंतर..मुंबईसह राज्यात राजकीय नाट्य रंगलं. पण, संध्याकाळी पावणे सहा वाजता. अजित पवारांनी काकांना संदेश माध्यमांसह कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आणि कार्यकर्त्यांना घरी जाण्याचं आवाहन केलं. असं असलं तरी शरद पवारांच्या एका निर्णयानं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातला सर्वात मोठा आणि पहिला प्रश्न... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण होणार? याचीच निवड करण्यासाठी एका समितीची घोषणा झाली आहे. त्यात सुनील तटकरे, जयंत पाटील, अजित पवार,  छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ यांचा समावेश आहे. आता हीच समिती नवा अध्यक्ष निवडणार आहे. 


पण, जेव्हा पवारांनी पद सोडलं तेव्हा यापैकी अजित पवार सोडले. तर प्रत्येकानं पवारांच्या निर्णयांचा विरोध केला आणि जर पवारांनी निर्णय मागे घेतला नाहीत. तर याच समितीसमोर नवा अध्य़क्ष शोधण्याचं आव्हान असणार आहे. विठ्ठल मणियार शरद पवारांचे वर्ग होते. त्यांनी आजच्या निर्णयाच सखोल विश्लेषण केलंय   हा निर्णय अचानक घेतलेला नाही साहेबांनी विचाराने हा निर्णय घेतलाय. त्यांची इच्छाशक्ती फार आहे.. राष्ट्रावादीत पुर्णपणे लोकशाहीपणे निर्णय होतो. शरद पवार घेतलेल्या निर्णयाचे परिणाम सहन करतात. त्यांचे निर्णय चांगले ही होतात.  आता याच निर्णयाचे पक्षावर काय परिणाम होणार आहे.


महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार पक्षात एकजूटता वाढेल की नाही.. याची उत्तरं पुढील काही काळात मिळेल. पवारांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.आपल्या टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले पवार..असा निर्णय का घेतील..हाच प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याला पडला होता.. दिवसभराच्या घडामोडींनंतर.पवारांनी निर्यणावर विचार करणार असल्याचं अश्वासन दिलं.पण, भाकरी फिरवणार असं म्हणत. पवारांनी तवाच फिरवल्याच्या चर्चांना ब्रेक कसा लागणार आणि ते राजीनामा मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.