पुणे: 'एवढी वर्ष एकत्र काम करणाऱ्यांची युती तुटली याचं मला अतीव दु:ख वाटतं.' अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. दरम्यान ही प्रतिक्रिया देताना ही पवारांना त्यांच्या चेहऱ्यावरचं सूचक हास्य लपवता आलं नाही.


शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर अनेक नेत्यांकडून याबाबत वक्तव्य सुरु आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलतान शरद पवारांनी युती तुटल्याच्या प्रश्नावर अतिशय खोचक अशी प्रतिक्रिया दिली. 'युती तुटल्याचं मला दु:ख होतं आहे.' असं पवार म्हणाले.

दरम्यान, जर शिवसेना राज्यातील सत्तेतून बाहेर पडली तर तुम्ही पाठिंबा देणार का? या प्रश्नावर पवार म्हणाले की, 'आधी त्यांनी निर्णय घ्यावा आणि मग आमच्याशी चर्चेला यावं.'

दुसरीकडे ‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार.’ अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली. गोरेगावच्या शिवसैनिक मेळाव्यात त्यांनी आज ही घोषणा केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ‘काल देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये एक पुरस्कार ‘गुरूदक्षिणा’ म्हणून दिला गेला अशी चर्चा आहे.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

संबंधित बातम्या:

एबीपी माझा सर्व्हे: शिवसेना स्वबळावर मुंबई पालिका काबीज करू शकेल? 

शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार