नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली.  दोघांमध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी 2010मधील त्या पत्रावरही भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, ते पत्र कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात लिहिलेलं होतं. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचंही शरह पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.


2010मधील त्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर मौन सोडलं आहे. कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात ते पत्र लिहिल्याचं शरद पवारांनी सांगितलं. तसेच  त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं, असंही पवार म्हणाले आहेत. एवढंच नाही तर 'आता जे तीन नवे कृषी कायदे आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही.', असंही शरद पवार म्हणाले आहेत.


शरद पवार यांनी यावेळी विषय भरकटवण्यासाठी हे केलं जात असल्याचाही आरोप केला. याला जास्त महत्व देऊ नका असंही ते म्हणाले आहेत. शरद पवारांनी आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगितलं. पत्रकार परिषदेत शरद पवार काहीसे पत्रकारांवर चिडल्याचं पाहायला मिळालं. कृषी कायद्यासंदर्भात चर्चा झाल्याशिवाय त्याबाबत काहीही भाष्य करणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. मात्र पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने शरद पवार संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले.


शेतकरी कायद्यासंदर्भात महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी : देवेंद्र फडणवीस

केंद्राच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात भाजप विरोधी आघाडीने भारत बंदची घोषणा केली आहे. यावर भाजप नेत्यांनी तीव्र आगपाखड केली असून शेतकरी कायद्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच 2010 साली केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनीच या कायद्याची शिफारस केली असल्याचा दावा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

महत्त्वाच्या बातम्या :