नाशिक : आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याची वेळ डॉक्टरांनी आणू नये, कर्तव्य बजवावे. जास्त पैसे आकारतात त्यांचे ऑडिट होत असून यापुढे कडक तपासणी होणार आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये, असंही शरद पवार यांनी म्हटलं. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठक घेतली


उद्धव ठाकरे यांची नाशिकला भेट देण्याची इच्छा आहे त्यामुळे ते येतील. आम्ही आमचं निरीक्षण घेत आहोत ते धोरणात्मक निर्णय घेतील. कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीबाबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, महाराष्ट्र, तामिळनाडूमध्ये रुग्ण संख्या जास्त आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद या शहरात अधिक आहे. अनेक तज्ज्ञांनी सांगितले कोरोनाला घेऊन जगावे लागेल. म्हणून जिथे रुग्ण जास्त आहे तिथे आढावा घेत आहोत. आर्थिक संकट मोठं आहे, लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा.


भाजपने शरद पवार यांच्या बैठकीवर आक्षेप घेतल्यानं पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. तब्बल साडेतीन तास बैठक सुरू होती. यात 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान नाशिक शहरात वाढणारी रुग्णसंख्येचा आढावा घेऊन तयारी करण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले. राज्यभर कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत असून त्यावर मुख्यमंत्री धरोणात्मक निर्णय घेत असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


नाशिकला राज्याचं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, मात्र इथेच डॉक्टर सेवा बजावत नसतील तर गंभीर आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यची वेळ डॉक्टरांनी आणू नये असा इशारा पवार यांनी दिला. आम्ही राजकारण करत नाही, देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी करू नये असा सल्लाही त्यांनी दिला.


Solapur Plasma Therapy | सोलापुरात प्लाझ्मा थेरपीला तांत्रिक अडचणींमुळे ब्रेक | स्पेशल रिपोर्ट