Sharad Pawar : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. ते पुण्यात बोलत होते. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक (Andheri Bypoll Elections) जाहीर झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.
राज्यात दसरा मेळाव्यावरुन राज्यात जे राजकारण सुरु आहे ही दुर्दैवाची बाब आहे. एका पक्षाचे दोन भाग झालेत पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी. आमच्यासारख्या सीनियर मंडळींनाही सांगावं. मात्र आता दसरा मेळाव्यात दोन्ही गट आपली भूमिका मांडणार आहेत. त्या भूमिकेमुळे कटुता वाढणार नाही यावर लक्ष द्या, असा सल्ला देखील शरद पवार यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाला दिला आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे. शिवसेना हा वेगळा पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रवादी त्यात काहीही करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातलं राजकारण सुधारण्यास मदत होईल
शिवसेनेच्या बंडानंतर दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून हा वाद आणखी चिघळताना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही गटामध्ये स्पर्धा रंगली आहे. टीझर वॉरदेखील बघायला मिळाले. यात आता शरद पवारांनी देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. दोन्ही गटाने दरसा मेळाव्यात दोन्ही गटाने मर्यादा ठेवली पाहिजे ती मर्यादा ओलांडली तर राज्याच्या दृष्टीने हे योग्य नाही. त्यांनी चांगली भूमिका मांडावी, त्याने राज्यातलं वातावरण सुधारण्यास मदत होईल, असं म्हणत त्यांनी ठाकरे आणि शिंदे गटाला खडसावलं आहे.
'ही काँग्रेसची यात्रा आहे'
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काहीच दिवसात महाराष्ट्रात येणार आहे. ही यात्रा कॉंग्रेस पक्षाची आहे. त्याचं नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. त्यात कॉंग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे एकत्र असलो तरीही इतरांनी त्यात सहभागी व्हायचं असं काहीही कारण नाही किंवा त्याबाबत सूचनाही नाही, असं ते म्हणाले
'हा निर्णय राज्य सरकारचा आहे.'
आम्ही कधीही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केलेली नाही. तो निर्णय राज्य सरकारचा आहे. त्यामुळे त्यांनीच यावर योग्य निर्णय घ्यावा असंही त्यांनी म्हटलंय.
'शिवसेनेचा कोणताही प्रस्ताव आला नाही'
2014 ला शिवसेनेचा प्रस्ताव आला होता. तसं घडलं असतं तर आज राजकीय परिस्थिती वेगळी असती, असं वक्तव्य कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं होतं. त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, सरकारचा कुठलाही प्रस्ताव असता तर मला समजलं असतं. मात्र अशोक चव्हाण या विषयावर काही बोललल्याचं मला तरी माहिती नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Politics Sharad Pawar: ...तर शरद पवार काय आहेत, हे देशाला कळल नसतं: सुशीलकुमार शिंदे