Sharad Pawar आमची बारा जणांची आमदारकीसाठीची यादी राज्यपालांनी मंजुर केली नाही. पण आता नव्या सरकारकडून यादी दिली जाईल आणि ती राज्यपाल मंजूर करतील.  राज्यपाल पदावर येताना ते निरपेक्ष पद्धतीनं काम करण्याची शपथ घेतात. आताचे राज्यपाल निरपेक्ष पद्धतीच्या कामाची नवी व्याख्या देशासमोर ठेवतील. मी पदग्रहणाच्या अनेक शपथा पाहिल्या किंवा स्वतःही अनेक शपथा घेतल्या. पण राज्यपालांनी पेढा भरवल्याचे मी कधी पाहिले नाही किंवा मी स्वतःही कधी पेढा खाल्ला नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. 


विधिमंडळात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची जी संख्या आहे  ते पाहता न्यायालयाचा निकाल काय येईल हे सांगता येत नाही. सभागृहात गेल्यावर हे सगळे विचारवंत ( फुटीर आमदार) काय करतील हे सांगता येत नाही. काही जण म्हणतात की सभागृहात गेल्यावर त्यांचे मतपरिवर्तन होईल. पण मला माहित नाही.  सर्वोच्च न्यायालयाची कालची कमेंट गंभीर. गृह मंत्रालयाला जाब विचारण्यात आलाय, असे शरद पवार म्हणाले. 


आम्हाला काळजी घ्यावी लागेल -
मागीलवेळी मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक नेते फोडले होते या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'फडणवीस नव्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना स्वतःकडे घेतायत.  याबाबत आम्हाला काळजी घ्यावी लागेल.' आमच्यावर हाय कमांडच्या नावाने त्यावेळेस भाजपकडून जी टिका वाहायची. तीच आता भाजपवर होतेय.  म्हणजे आमची कार्यपद्धती योग्य होती हे सिद्ध होतय, असेही शरद पवार म्हणाले. 


फडणवीस अस्वस्थ असू शकतात -
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाऐवजी वेगळ्या पदाची शपथ घ्यावी लागली. यामुळे ते नाराज नाहीत असं सांगतायत. पण ते अस्वस्थ असू शकतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच इन्कम टॅक्सच्या नोटीसवर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी बंधु प्रताप पवार यांच्या घरी राहिलो म्हणून इनकम टॅक्सने नोटीस बजावली. किंवा मुंबईत जिथे राहतो ते घर जावई सदानंद सुळे आणि मुलगी सुप्रिया सुळे यांच्या नावावर आहे म्हणून नोटीस आली.
 
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्तीमागे राजकारण नाही -
कोणत्याही राज्यातील कुस्तीगीर परिषदेबाबात तक्रारी असतील तर त्याबाबत निर्णय घेणे राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेला टाळता येत नाही. या कारवाईच्या आधी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्टीकरण मागण्यात आले नव्ह्ते. पण मी त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही.  मी अनेक क्रीडा संघटनांचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलय.  मी अशा संघटनांच्या कामांचे दोन भाग करतो. एक भाग खेळ आणि खेळाडूंबाबत आणि दुसरा भाग क्रिडा संस्थेच्या प्रशासनाबाबत.  मी पहिल्या प्रकारच्या कामात ढवळाढव करत नाही. यात कोणतेही राजकारण नाही. वेगवेगेळ्या विचारांचे राजकीय नेते खेळच्या संघटना चालवताना राजकारण आणत नाहीत, असे शरद पवार म्हणाले. 


 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेबाबात दोन तक्रारी भारतीय कुस्तीगीर महासंघाकडे होत्या. पहीली तक्रार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यपद्धतीवर होती तर दुसरी तक्रार ज्युनियर लेवलच्या स्पर्धांचे आयोजन न  करण्यात आल्याची होती. या परिस्थितुन मार्ग काढण्यासाठी रामदास तडस आणि काका पवार यांच्यासोबत एकत्र येऊन बैठक घेऊन मार्ग काढू. बाळासाहेब लांडगे यांच्याबाबत नक्की काय राग आहे याची मी माहिती घेईन. मी याबाबत ब्रीजभुषण सिंग यांच्याशी याबाबत दिल्लीत गेल्यावर बोलणार आहे, असे शरद पवार म्हणाले.