मुंबई : काँग्रेस पक्षाला पवारांसारखा मोठा वकील लाभला आहे. त्यांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर जर कोण मान्य करत नसेल तर त्यांनी नेता म्हणवून घेऊ नये, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आगामी काळात निवडणूक आम्ही राष्ट्रवादी-काॅग्रेसच्या विरोधात लढवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.


गांधी कुटुंबानं याबाबत स्पष्टीकरण द्यावं
ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा माणूस आहे. या घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पार्टीला झाला आहे. ईडीने हीच गोष्ट कोर्टासमोर सांगितली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने आणि गांधी कुटुंबानं याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. इटालिअन कोर्टाने ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी जे निर्णय दिले आहेत. त्यामध्ये चार वेळा सोनिया गांधींचं नाव आलं आहे. त्यामुळे हे जे पुरावे समोर आले आहेत त्यावर काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

या VVIP हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी मिशेलने आपल्या एजन्सीसमोर जे खुलासे केले आहेत. तसेच जे कोर्टाला सांगितले आहे, यात सोनिया गांधींच नाव आहे. यामध्ये इटालिअन लेडी त्यांचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो, असा उल्लेख आला आहे. यावरुन यात गांधी कुटुंबाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

VVIP हॅलिकॉप्टरच्या संदर्भात ज्या गोष्टी बाहेर येतात त्याबद्दल काँग्रेस परिवारानं उत्तर द्यावी ही आमची मागणी आहे. टेंडर प्रक्रियेमध्ये तीन कंपन्या सहभागी होत्या त्यातल्या एका कंपनीनं माघार घेतली. यामध्ये मोठा भष्ट्राचार झालेला आहे त्यामध्ये अनेक नेते, अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली. इटलीच्या लोअर कोर्टानं या दोषींना शिक्षा देखील सुनावली होती, असेही फडणवीस म्हणाले.

शिवसेनेच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही
अहमदनगरमध्ये आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतो. याबाबत आमचे नेते बोलत होते, मी तसं सांगितलं होतं. तीन दिवस आधीपर्यंत शिवसेना बोलायला तयार नव्हती. आमची शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही वाट पाहिली मग अधिकार खालच्या नेत्यांना दिले. राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आगामी काळात आम्ही निवडणूक राष्ट्रवादी-काॅग्रेसच्या विरोधात लढवणार  आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.