मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा खासदार नारायण राणे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला शरद पवार यांनी प्रस्तावना दिली आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुख्य उपस्थिती आहे. 16 ऑगस्टला पुस्तक प्रकाशनाचा सोहळा मुंबईत होणार आहे. राणेंची भाजपशी सलगी असूनदेखील मुख्यमंत्र्यांनी मात्र या कार्यक्रमाला वेळ दिलेली नाही.
विशेष म्हणजे राणेंच्या मराठीतील पुस्तकाला खुद्द शरद पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तर, तिकडे राणे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात भेट झाली. त्यामुळे एकीकडे युतीच्या चर्चा होत असताना राणेंच्या या भेटींनी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या पुस्तक प्रकाशनाला वेळ दिलेला नाही आणि शरद पवार मात्र उपस्थित राहणार असल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगळी राजकीय समीकरण जुळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्यामागचं कारण आपण आत्मचरित्रातून उलगडणार असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर आत्मचरित्रातून अनेक गुपितांवर प्रकाश टाकला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी वैयक्तिक काहीही मतभेद नाहीत. त्यांच्याशी असलेले मतभेद वैचारिक आहेत. उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला तेदेखील आपण आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे असेही नारायण राणेंनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर माझ्या आत्मचरित्रात मी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या सगळ्या पक्षांमधल्या प्रवासाबाबत लिहिलं आहे असंही राणे यांनी स्पष्ट होतं. त्यामुळे या आत्मचरित्रात नेमकं काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
नारायण राणे यांनी 1972 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवलं होतं. आघाडीची सत्ता असताना 2005 मध्ये त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम कर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली. आता ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत खासदार आहेत.
नारायण राणेंच्या आत्मचरित्राला शरद पवारांची प्रस्तावना, प्रकाशनालाही पवारांची प्रमुख उपस्थिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jul 2019 02:14 PM (IST)
विशेष म्हणजे राणेंच्या मराठीतील पुस्तकाला खुद्द शरद पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तर, तिकडे राणे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यात भेट झाली. त्यामुळे एकीकडे युतीच्या चर्चा होत असताना राणेंच्या या भेटींनी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -