औरंगाबाद : राज्यभरात दुष्काळी परिस्थितीनंतर पावसाळाही लांबल्याने अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यातच 'पाऊस हवा असेल तर सरकारनं पर्जन्य यज्ञ करावा', असा सल्ला शंकराचार्य नृसिंह भारती यांनी दिला आहे.
राज्यातील जलयुक्त शिवाराचं काम तर उत्तम झालं आहे, असं प्रमाणपत्रही त्यांनी सरकारला दिलं आहे. भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादमध्ये संत परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शंकराचार्य नृसिंह भारती बोलत होते.
विशेष म्हणजे शंकराचार्यांनी सल्ला दिला त्यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यासारख्या नेत्यांसह राज्यातील वारकरी समुदायही या परिषदेसाठी उपस्थित होता.