Shahajibapu Patil : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) त्यांच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची बोलण्याची स्टाईल चर्चेचा विषय ठरत आहे. शिंदे गटाच्या बंडावेळी काय झाडी काय डोंगर काय हाटील असं म्हणत त्यांनी गुवाहाटीच्या (Guwahati) निसर्गाचं वर्णन केलं होतं. त्यांचं ते कॉल रेकॉर्डिंग चर्चेचा विषय ठरलं होतं. आता त्यांनी एका अधिकाऱ्याला फोन केला आहे. तो सध्या चर्चेत आला आहे. सोलापूरच्या उजनी धरणातील (Ujani Dam) पाण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला फोन करुन त्याला खडसावलं आहे. 


आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोलापूरच्या उजनी धरणातील पाण्यासाठी एका अधिकाऱ्याला फोन करुन खडसावलं आहे. 'खोड्या बंद करा. असल्या खोड्या चालणार नाहीत. असली दादागिरी इथं चालणार नाही', असं म्हणत शहाजीबापूंनी अधिकाऱ्याला चांगलचं खडसावलं. उजनीचे पाणी सोडण्यासंदर्भात शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्याला फोन केला होता. 



 


नेमकं काय म्हणाले शहाजीबापू पाटील


उजनी धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्याला फोन केला होता. यामध्ये त्यांनी अधिकाऱ्याला चांगलेच खडसावले. तुमच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना खोड्या बंद करायला लावा. फॉर्म काढा, पैसे भरा असली दादागिरी करु नका. तुम्हाला पैसेच पाहिजे होते तर महिन्याभरापूर्वी तुम्ही शेतकऱ्यांच्या दारात का गेले नाहीत, तिथं ऑफिसमध्ये पंख्याखाली बसलेत असा सवाल शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्याला केला. आता ऐनवेळी पिकं पाण्याला आली असताना तुम्ही शेतकऱ्यांच्यी अडवणूक का करता अशी विचारणा देखील पाटील यांनी अधिकाऱ्याला केली. तसेच त्यांनी पाणी कधी सोडणार अशी विचारणाही केली. त्यावर अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
 
कोण आहेत शहाजीबापू पाटील ?


शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार
विद्यार्थी दशेपासून शहाजी पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते
1985 साली त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली
1985 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पराभव
त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचा पराभवच झाला
1995 मध्ये शहाजी पाटील हे 192 मतांनी निवडून आले
त्यांनी 1995 ला गणपतराव देशमुख यांचा पराभव केला
त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत शहाजीबापूंचा पराभव झाला
2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
2019 ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजीबापू आमदार झाले


दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत सुरत, गुवाहाटी इथेही दाखल झाले होते. गुवाहाटीमध्ये असताना त्यांनी एका कार्यकर्त्याला केलेला कॉल चांगलाच व्हायरल झाला होता. काय झाडी काय डोंगर काय हाटील असं म्हणत त्यांनी गुवाहाटीच्या निसर्गाचं वर्णन केलं होतं. तेव्हापासून ते चांगलेच चर्चेत आले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: