मुंबई : शिक्षक भारती अधिवेशनाला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांसोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिक्षकांचे प्रश्न महाविकास आघाडीचा सरकार लवकरात लवकर सोडवेल असा आश्वासन देत भाजप सरकारवर निशाणा साधला. ज्यांनी इतिहासातील धडे बदलण्याचा प्रयत्न केला त्या सरकारलाच आम्ही बदललं असा टोला संजय राऊत यांनी लावला तर ज्याला धडा अनेकदा सांगून कळत नाही अशाला धडा शिकवायलाया संजय राऊत सोबत आले असं शरद पवार म्हणाले.


मागच्या राजवटीमध्ये कुठल्या मंत्र्याच्या घरी मी गेलो नाही. पण शिक्षणमंत्र्यांच्या घरी मात्र दोन-तीन वेळा गेलो. त्याचं कारण, महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे प्रश्न व नवी पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा मला अत्यंत महत्त्वाचा वाटत होता. त्यामुळे कुठलाही कमीपणा न घेता मी शिक्षणमंत्र्यांच्या घरी गेलो, अनेक बैठका घेतल्या. पण काही उपयोग झाला नाही. प्रश्न सोडवण्यासाठी काही बदल करण्याची त्याठिकाणी आवश्यकता होती. धडा हा असा आहे... हे पुनःपुन्हा सांगून जर विद्यार्थ्याला समजत नसेल तर त्याला तो धडा शिकवावा लागतो, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे सूत्रं एकदा मान्य केल्यानतंर कुठल्याही राज्यकर्त्यांची ही जबाबदारी असते की वाड्या-वस्त्यांवरील मुला-मुलींकडे जास्त लक्ष असावं. पण, याठिकाणी 20 वर्षांपासूनच्या शाळा बंद करण्यात आल्या. शाळा बंद करण्यासाठी अक्कल लागत नाही. चालू ठेवायला अक्कल लागते.

संजय राऊत म्हणाले, स्टेडियम फक्त आम्हीच भरू शकतो असे वाटले पण शिक्षकांनी चुकीचे ठरवले. महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावल्याने ही संगतीचा परिणाम आहे. हजारोंच्या संख्येने शिक्षक प्रश्न घेऊन उपस्थित आहेत. जसा पाच वर्ष तुम्ही संघर्ष केला तसाच आम्हीही सत्तेत राहून संघर्ष केला. पाच वर्षात इतिहास बदलला, धडे बदलले मग आम्ही काय केले तर सरकार बदलले. धडे बदलणाऱ्यांना घरी बसवले.
Sharad Pawar | पंढरपुरात नेहमी जातो पण प्रसिद्धी करत नाही, राजकारण प्रसिद्धीसाठी हा गैरसमज - शरद पवार


महाराष्ट्राला शिक्षणाची मोठी परंपरा त्यामुळे शिक्षण क्षेत्राची सफाई आवश्यक आहे. शरद पवार नाम ही काफी है. हा नेता दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीला झुकावे लागते , त्यामुळे येथेही परिवर्तन आवश्यक आहे. शिक्षकांच्या शंभरहून अधिक मागण्या आहेत. पवारांनी काहींवर लाल तर काही वर हिरव्यावर टिक केले आहे हो राज्यकर्त्यांचे लक्षण आहे. निशाणी घड्याळ असल्याने डोक्यात टिक टिक चालू त्यामुळे महत्त्वाच्या मागण्यांवर टिक झालं आहे.

महाराष्ट्राला परंपरेने लाभलेले बदलून प्राथमिक शिक्षण बदलण्याचा प्रयत्न केला. शिक्षक गुलाम नाही, तो शिक्षक आहे त्याला राजकीय सेवकासारखा वागवण्याचा प्रयत्न केला मागील 5 वर्षात करण्यात आला. शिक्षणातील काहीही न कळणाऱ्याला शिक्षणमंत्री बनविले होते. शिक्षणखाते क्रमांक एकचे खाते असायला हवे ते नवीन सरकारमध्ये आपण करू. महाराष्ट्र घडविण्याचे काम शिक्षकी पेशाच्या हाती, त्यामुळे मंत्रालायमध्ये शिक्षकांना ताठ मानेने जायला हवे अशी वेळ आणायची आहे, असेही शरद पवार म्हणाले.