मुंबई : आमदार नितेश राणे सभागृहात बोलताना म्हणाले की, मी कोल्हापुरातील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी एन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचं सांगितलं. पण एका कर्मचाऱ्याने मला सांगितलं की साहेब, हे सीटी एन्जिओ करु नका. त्या निमित्ताने इंक शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुण टाकण्याचा प्लॅन आहे. या कर्मचाऱ्याने मला आधीच सांगितल्याने मी जिवंत राहिलो. 


नितेश राणे पुढे म्हणाले की, या राज्यात गुन्हे वाढत आहेत. पण राज्य सरकारकडून त्या संबंधी खोटी माहिती दिली जात आहे. फार मोठ्या मोठ्या गोष्टीत या लोकांना लक्ष घालायचे आहे, यांना फार मोठी काम करायची आहेत. विरोधी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल करायचे आहेत. पालिकेला तर काहीच काम राहिले नाही. पालिकेच्या आयुक्ताला फक्त आता लोकांच्या घराची मेजरमेन्टची काम रहिले आहे. यांना विचारले तर हे म्हणतात की वरुन आदेश आले. नेमके वरून आदेश येतात तरी कुठून? 


रात्री अडीच वाजता मला अटक करायला आले होते असं सांगत आमदार नितेश राणे म्हणाले की, माझी शुगर लेव्हल कमी होत होती. तरीही मला पोलीस अटक करण्यासाठी येत होते. दिशा सालियनची आत्महत्या असेल तर मग सीसीटीव्ही का गायब केले. त्या ठिकाणचा वॉचमन गायब झाला, वहीची पाने गायब झाली. रोहन रॉय गायब आहे. दिशाची आत्महत्या नाही, ती हत्या आहे. 


माझ्याकडे एक पेनड्राईव्ह
माझ्याकडे पेन डाईव्ह आहे तो मी न्यायालयात देणार असंही आमदार नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले की, माझ्याकडे पुरावा आहे, आम्ही सिद्ध करू शकतो. 8 तारखेच्या रात्री राज्यातला एक मंत्री त्या पार्टीत होता. त्याचे पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात देऊ. 


पोलिसांनी आता कामावर लक्ष द्यावे, जनतेवर लक्ष द्यावे. नितेश राणे काय करतात, कोणते कपडे घालतात याकडे लक्ष देऊ नये असाही टोला त्यांनी लगावला. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


 


ABP Majha