उस्मानाबादमध्ये पैसे वाटण्याची अफवा, सेना-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2016 10:14 AM (IST)
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील मुरुम नगरपरिषद निवडणुकीदरम्यान पैसे वाटण्याच्या अफवेवरुन कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त बाचाबाची झाली. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी एकूण 27 जणांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. माजी मंत्री शिवशरण बसवराज पाटील यांच्या मुलासह काँग्रेसच्या 18, सेनेच्या 5, राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.