वर्धा : राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीतून साडे तीन लाखांची रोकड जप्त
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2016 09:25 AM (IST)
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार सुधीर कोठारी यांच्या गाडीतून 3 लाख 36 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या रकमेत सर्व जुन्या पाचशेच्या नोटा आहेत. पोलिसांनी रात्री दीड वाजता नाकाबंदीदरम्यान ही कारवाई केली. कारवाई चालू असताना सुधीर कोठारी यांनी पोलिसांसमक्ष गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपवलं आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल.