पालघर : पालघरमधील सर जे.पी. इंटरनॅशनल स्कूल पालघर या स्कूल बसचा पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून  घरी परत सोडत असताना हा भीषण अपघात झाला.

या अपघातात 4 विद्यार्थी आणि चालक गंभीर जखमी असून 15 विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पालघर येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

भरधाव चाललेल्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस झाडाला आदळल्याने हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं. तर या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे.

शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं जातं असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.

जखमी विद्यार्थी

प्रियांश सचिन घरत, विहान ज्ञानेश्वर किणी, आराध्य सुमित सिंह, छवी रविंद्र चौरासिया