बीड : कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक सेवेसाठी खर्च करणं आवश्यक होतं मात्र कोरोनाची भीती दाखवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केला आहे. बीड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होती. या बैठकीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यावेळी बोलताना नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई आणि केजच्या कोविड हॉस्पिटलसाठी खरेदी करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याची तक्रार केली आहे.


मागच्या अकरा महिन्यांमध्ये कोरोनाच्या संकट काळात जिल्ह्यामध्ये 50 कोटी रुपयांचा निधी हा केवळ कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी जिल्हा नियोजन समितीसह गौण खनिज, आपत्ती निवारण अशा विभागांकडूनही निधी उपलब्ध करुन देण्यात आला.


केजच्या जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाई शेजारील लोखंडीला उभारलेल्या कोविड रुग्णालयातही सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. इतर रुग्णालयांतही सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र यासाठी दाखविलेला खर्चच मुळात अवास्तव असल्याचा त्यांचा आरोप नमिता मुंदडा यांनी केला आहे.


विशेष म्हणजे सीसीटीव्हीचे टेंडर हे या पूर्वीच्या सीएस अर्थात जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढले होते. यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याविषयी बोलताना मुद्रा म्हणाल्या की, टेंडर काढण्याचे काम हे सीएसे नाही ते एनआयसीने काढणे आवश्यक होते. पण संबंधित कंत्राटदाराला पैसे देण्याच्या उद्देशानेच हे टेंडर काढले गेल्याचा आरोप आमदार नमिता मुंदडा यांनी केला आहे.


विशेष म्हणजे लाखो रुपयाचे सीसीटीव्ही बसवल्यानंतर ही हे सीसीटीव्ही काम करत नसल्याची माहिती केज उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनीच शल्यचिकीत्सकांना दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


बाबो! क्रेननं हार घालत धनंजय मुंडेंचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत