जालना : जालन्यात 2022 ते 2024 दरम्यान अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाल्यावर संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई होईल अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण तथा जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. जालन्यात अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये 40 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये आढळून आले आहे. यात 26 तलाठी आणि 10 ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकावरती ठपका ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी 10 तलाठ्यांचे निलंबन करण्यात आलं असून या घोटाळ्यासंबंधी इतर तलाठी तसेच  महसूल आणि कृषी कर्मचाऱ्यांची देखील चौकशी सुरु आहे.या प्रकरणी सर्वच दोषी तलाठ्यांना 48 तासात लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने 10 जणांवर निलंबांची कारवाई करण्यात आलीय. दरम्यान चौकशी समितीकडून इतर खुलासे तपासण्यात येत असून आणखी 10 ते 15 जणांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या कारवाईने गैरप्रकार करणाऱ्या इतरांचेही धाबे दणणाणले असल्याचे बोलले जात आहे.  शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीत बनावट शेतकरी दाखवून, तसेच जमीन नसताना आणि एकाच नावावर दोनदा अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला होता. यात 26 तलाठी आणि 10 कृषी सहायक आणि ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी: मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता, 10 टक्के निर्यात प्रोत्साहन अनुदान पुन्हा सुरु करण्याची मागणी