मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार घेत परीक्षा घेण्यासंदर्भात भूमिका मांडली आहे.


उदय सामंत म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायाचा आदर करतो. राज्य सरकारनं विद्यार्थी व पालकांची भूमिका ठामपणे न्यायालयात मांडली. अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रतिज्ञापत्रातही आम्ही या परिस्थितीत परीक्षा घेऊ शकत नाही असं कळवले होते. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा निर्णय घेण्याबाबत ऐच्छिक मुभा द्यावी, असं सरकारनं न्यायालयाला सांगितलं होतं. तसा शासन निर्णयही काढण्यात आला होता. परीक्षा रद्द करण्याचं सरकारनं म्हटलं नव्हतं. पण करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पदवी देण्याचा निर्णय होता. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेडसाठी परीक्षा द्यायची आहे. त्यांच्यासाठी घेतली जाणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे परीक्षा न घेण्याचा निर्णय विद्यार्थी आणि पालक यांचा विचार करून घेतला होता. याबाबत आरोप -प्रत्यारोप करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करून यातून मार्ग काढावा लागेल आणि या निर्णयाचा आदर सर्वांनाच करावा लागेल.'


पाहा व्हिडीओ :  कुलगुरूंशी चर्चा करुन परीक्षांसदर्भात निर्णय घेणार : उदय सामंत



'महाराष्ट्र सरकारनं कोणतंही संकट नसताना हा निर्णय घेतलेला नव्हता, तर विद्यार्थी, पालक आणि सगळीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला होता. आपत्ती व्यवस्थापनानं तो अंतिम केला होता. पण, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा आदर करून भविष्यात परीक्षा कशा घ्यायची यासंदर्भात चर्चा करणार आहोत. यूजीसीकडून वेळ मागून घेण्यासाठी निर्णय घ्यावे लागतील. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणे मार्ग काढावा लागणार असून, कुलगुरूंशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन कशा पद्धतीनं परीक्षा घेता येतील, या संबंधी योजना तयार करण्यात येणार आहे.' असं उदय सामंत म्हणाले.


ट्विटच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांनी भान ठेवावं : उदय सामंत


सामंत म्हणाले की, 'परीक्षा न घेण्याबाबत मत असलेल्या इतर राज्यांशी चर्चा करण्याआधी राज्याचे महाधिवक्ता आणि न्याय व विधी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसेच विद्यार्थांना परीक्षा रद्द झाल्या तरी अभ्यास करायचाच आहे. ट्वीटच्या माध्यमातून जे टीका टिप्पणी करत आहेत. त्यांनी भान ठेवावं. 30 सप्टेंबरच्या डेडलाईनबाबत बंधन नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन याबाबत राज्याची भूमिका UGC समोर मांडणार आहे. मन स्वच्छ ठेऊन 100 विध्यार्थ्यांना परिक्षासंदर्भात मत विचारावं. त्यानंतर टीका करावी. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युवा सेनेवर टीका केली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या :