नागपूर : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंबाझरी शाखेतील कस्टमर असिस्टंटचा कॅश काऊंटवर काम करत असताना मृत्यू झाला. आर.व्ही. राजेश असं कर्मचाऱ्याचं नाव, त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.


दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयांनंतर बँक कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यातच नोटा बदलीसाठी रांगेत उभारलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन दिवसांपुर्वी पुण्यातील खेडमधील SBI बँकेच्या कर्मचारी तुकाराम तनपुरे यांचाही अशाचप्रकारे कामावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

त्यातच आज नागपूरमधील अंबाझरी शाखेतील एसबीआय बँकेचा कर्मचारी आर. व्ही. राजेश यांचा मृत्यू झाला आहे.