Pune News : महाविद्यालयांच्या परिसरात ई सिगरेटवर (Pune) बंदी घालण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निर्देश महाविद्यालयांना दिले आहे. तसं पत्र विद्यापीठाकडून काढण्यात आलं आहे. सध्या महाविद्यालयीन तरुण व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात तरुणांनी व्यसन करु नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची विशेष तपासणी मोहीम राबवण्याची सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत.


ई सिगरेट महाविद्यालयाच्या परिसरात विकली जात असल्याने अनेक विद्यार्थी या व्यसनांच्या जाळ्यात अडकल्याचं मागील काही दिवसांमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांवर आळा घालणं गरजेचं आहे. ई सिगरेटचा वापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनलयाने विद्यापीठे, महाविद्यालयांना निर्देश दिले होते. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करून महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांच्या परिसरात ई सिगरेटची विक्री आणि उपयोग होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


इलेक्ट्रॉनिक सिगारेट (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) प्रतिबंध अधिनियम, 2019 या अधिनियमाद्वारे इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि उपकरणांच्या पदार्थांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांच्या परिसरांमध्ये विक्री तसेच वापर केला जाणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन महाविद्यालयाला दिले आहेत. 


ई सिगारेट महाविद्यालयांच्या परिसरात विकली जात असल्याने विद्यार्थी व्यसनांच्या जाळ्यात ओढले जातात. या पार्श्वभूमीवर ई सिगारेटचा वापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनलयाने विद्यापीठे, महाविद्यालयांना निर्देश दिले होते. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांच्या परिसरात ई सिगारेटची विक्री आणि उपयोग होणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.


उडता पुणे होणार का?


खून, मारामाऱ्या झाल्या की, महाराष्ट्राचा बिहार झालाय का? असा सवाल विचारला जातो. मात्र आता पुण्याचा उडता पंजाब होऊ पाहतोय का? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. रस्तोरस्ती नशेचा बाजार आणि गल्लोगल्ली नशेत झिंगणारे आणि हिंसक कृत्य करणारे तरूण, असं चित्र पुण्यासह महाराष्ट्रात वारंवार दिसू लागलंय. महाराष्ट्रात आधीच गुन्हेगारीचा जाळ धगधतोय आणि त्यातून अंमली पदार्थांचा धूर निघू लागला आहे. मागील काही दिवसांत पुण्यात सात कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आणि हे ड्रग्ज विकणारे देखील महाविद्यालयीन तरुण असल्याचं समोर आलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pune-Mumbai Express Way : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 'या' वेळेत आज मेगाब्लॉक