सातारा: जिल्ह्यातील पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आलं आहे. आजोबांना कोरोना झाल्यामुळे त्याची लागण नातीला झाली आणि त्या विद्यार्थिनीमुळे शाळेतील पाच विद्यार्थांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आलं आहे. त्यातील एका विद्यार्थ्यामुळे एका कुटूंबातील आजीलाही करोनाची बाधा झाल्याने आता सर्वच पालक भयभीत अवस्थेत आहेत.


पुसेगावातील सेवागिरी शाळेची पाचवी ते दहावीतील पटसंख्या जावळपास 750 आहे. यातील जवळपास 700 विद्यार्थी रोज नियमित शाळेत येत असल्याचं समोर आले आहे. पाचवी, सहावी, आणि आठवी या तीन वर्गातील सहा विद्यार्थी पॉझिटिव्ह झाल्यानंतर ही शाळा बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.


पुण्यात 'या' वेळेत पुन्हा संचारबंदी, शाळा, महाविद्यालयांबाबतही मोठा निर्णय


सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तसेच इतरही विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र खबरदारी म्हणून सर्वांना घरातच क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. आता सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी दिली आहे.


जे सहा विद्यार्थी कोरोना बाधित सापडलेल्या आहेत ते गावातील इतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्या शाळांमध्येही भीतीचे वातावरण दिसत आहे. सध्या शाळा जरी सुरु असली तरी शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. शाळेतील विद्यार्थी कोरोना बाधित सापडल्यामुळे सध्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक भयभीत अवस्थेत आहेत. पंधरा दिवसापूर्वी कोरेगाव तालुक्यातील एका निवासी मतिमंद मुलांच्या शाळेतील 31 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. या कोरोना बाधित विद्यार्थ्यांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.


पहा व्हिडीओ: #Corona सातारा-पुसेगावातील सेवागिरी विद्यालयात सहा विद्यार्थ्यांना कोरोना, शाळा बंद करण्याचा निर्णय



प्रसुती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज, बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार