सातारा : साताऱ्यातील मांढरदेवी गडावर झालेल्या हत्येचा पाच दिवसांनी उलगडा झाला आहे. मृत तरुणी ही मूळची मुंबईच्या वरळी परिसरातील असून तिच्या प्रियकरानेच खून केल्याचं समोर आलं आहे.


मांढरदेवी घाटात मालवाठार या वळणावरील जंगल परिसरात 15 एप्रिल रोजी एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन मृतदेह जंगलात फेकून दिला होता.

या तरुणीचं वय साधारण 24 वर्ष असून तिच्या हातावर बानू असं गोंदलेलं होतं. त्यावरुन वाई पोलिस मृत तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते.

अखेर पाच दिवसांनी पोलिसांना तपासात यश आलं. बानू कोकरे असं तरुणीचं नाव असून ती मुंबईमधील वरळीत राहत होती. दरम्यान, पोलिसांनी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.