Satara nagarpalika Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातारा नगरपालिकेच्या (Satara nagarpalika Election) प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ ब सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून या जागेवर एका पुरुषाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आज छाननीतही हा अर्ज वैध झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement


प्रभाग क्रमांक तीनमध्ये 3 ब सर्वसाधारण महिला राखीव जागा आहे


प्रभाग क्रमांक तीनमध्ये 3 ब सर्वसाधारण महिला राखीव जागा आहे. या जागेसाठी एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६ महिला असून त्यात एका पुरुषाचा उमेदवार अर्ज दाखल झाल्याची बाब भाजपचे माजी शहराध्यक्ष व नगरपालिका प्रभारी यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे एका पुरुषाचा महिला राखीव जागेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी नेमके करत होते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


महिलेसाठी जागा आरक्षित असताना एका पुरुषाचा अर्ज दाखल करून घेणे ही बाब अत्यंत गंभीर


सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा आरक्षित असताना एका पुरुषाचा अर्ज दाखल करून घेणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यातच आजच सर्व उमेदवारांची प्रभाग निहाय छाननी झाली आहे. मात्र, या छाननीमध्ये ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात न आल्याने नेमकी चूक कोणाची झाली? हा प्रश्न निर्माण झाला आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आ ला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. सध्या अर्जाची छाननी सुरु आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा (Nagarpalika Election Date) जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर (EVM) घेण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Kagal Nagar Palika Election: थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!