साताऱ्यात संपत्तीच्या वादातून आई आणि भावाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 09 Apr 2018 12:34 PM (IST)
प्रॉपर्टीच्या वादातून अनेक वेळा या कुटुंबाच्या तक्रारी पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्या होत्या.
सातारा : संपत्तीच्या वादातून आई आणि भावाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये घडली आहे. जयश्री घोडके आणि राजेश घोडके असं मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. आगाशिवनगर इथे हा प्रकार घडला. प्रॉपर्टीच्या वादातून अनेक वेळा या कुटुंबाच्या तक्रारी पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्या होत्या. आजही संपत्तीचा वाद उफाळून आला. आरोपी राकेश घोडकेने आई आणि भावावर चॉपर आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याने दोघांवर 50 पेक्षा जास्त वार केल्याचं समजतं. या प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, आरोपी राकेश घोडकेला अटक केली असून आई आणि भावाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.