सज्जनगडावर पत्नीचा फोटो काढताना दरीत पडून पतीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 19 Mar 2017 07:10 PM (IST)
सातारा : उंच ठिकाणी फोटो काढताना जराशी हलगर्जी कशी एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो, याचं उदाहरण साताऱ्याता पाहायला मिळालं आहे. पत्नीचा फोटो काढताना दरीत पडून पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सज्जनगडावर घडली आहे. साताऱ्यातील आंबवडे बुद्रुक गावातल्या धनंजय जाधव आणि निलम यांचं चार महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. धनंजय आणि निलम फिरण्यासाठी सज्जनगडावर आले होते. निलमचा फोटो काढण्यासाठी धनंजय दरीच्या टोकावर उभा होता. मात्र पाय घरसल्यामुळे धनंजय दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पत्नी निलमला देखील भोवळ येऊन ती जागीच कोसळली. शुद्धीवर आल्यानंतर तिनं स्थानिकांना गोळा करुन घडलेला प्रकार सांगितला. लोकांनी दरीतून धनंजयचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेनंतर जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.