अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ साताऱ्यात बहुजन क्रांती मोर्चा
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2017 04:56 PM (IST)
सातारा : कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि भारतीय संविधानाला कोणताही धक्का लावला जाऊ नये, अशा मागण्यांसाठी साताऱ्यात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा राजवाड्यावरून राधिका रोड मार्गे पोवई नाक्यावर आल्यानंतर येथे विराट सभा घेण्यात आली. अॅट्रॉसिटीसारखे दलितांचं कवच असलेले कायदे अजून कडक करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.