मुंबई : शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले (Sardar Raghuji Raje Bhosale) यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा 15 ऑगस्टच्या आधी लंडनहून महाराष्ट्रात परत आणू, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज दोन्ही सभागृहात दिली. विधानसभा सभागृहामध्ये महाराष्ट्र विधानसभा नियम 293 नुसार विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाने जी चर्चा उपस्थित केली होती, तसेच विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावाला उत्तर देताना आशिष शेलार यांनी उत्तर दिले.

रघुजी भोसले प्रथम 1695 ते 1755 हे मराठा सैन्यातील सेनापती होते

नागपूरच्या भोसले घराण्यातील शूर मराठा सरदार राजे रघुजी भोसले यांची तलवार ही लिलावात निघाली होती. त्याला भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची मालमत्ता समजून ती पुन्हा आणण्यासाठी एक चांगला प्रयोग, चांगला प्रयत्न हा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रयत्नातून सफल झाला. आपल्या इतिहासातली एक विरासत असलेली ही पराक्रमाची आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाची असलेली तलवार ही आपण पुन्हा एकदा मिळवण्यात आपण सफल झालेलो आहोत. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रघुजी भोसले प्रथम 1695 ते 1755 हे मराठा सैन्यातील सेनापती होते. नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक त्यांना केले. शौर्यासाठी आणि युद्धनीतीसाठी रघुजी भोसले यांना ‘सेना साहेब सुभा’ ही पदवी छत्रपती शाहू महाराजांनी दिली. 29 एप्रिल 2025 ला त्या ठिकाणी सोतेबायस लंडनमधल्या एका लिलाव करणाऱ्या कंपनीने ती तलवार ज्याच्यावर रघुजी भोसले यांचं नाव कोरलेला आहे आणि त्या तलवारीची वजमूठ सुद्धा सोन्याची आहे आणि या युद्धामध्ये पराक्रमात वापरली गेलेली तलवार कदाचित त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतातून महाराष्ट्रातून परदेशात गेली.

लंडनच्या लिलावात गेल्यावर आपण महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याला ज्या गतीने परवानग्या मिळण्यामध्ये कार्यालयीन व्यवस्था उभ्या केल्या. त्या व्यवस्थेमध्ये प्रवीण चल्ला यांच्या माध्यामतून महाराष्ट्र  शासनाने त्या लिलावात बोली केली आणि जवळ जवळ 69 लाख 94 हजार 437 करासहीत ही तलवार आपल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्या व्यवस्थेबरोबर करारनामा आपला बदली झाला. त्यासाठीच्या खर्चास 21 मे 2025 रोजी मान्यता दिली. आता कस्टम क्लीअरन्स, पॅकिंग, हाताळणी या सगळ्या बाबतीसाठी स्टार वर्ल्ड वाईड ग्रुप प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती करून  15 ऑगस्टच्या आधी जुलै महिन्यातच आपल्या मराठ्यांच्या, मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या पराक्रमाची साक्ष असलेली ही तलवार आपण सन्मानपूर्वक महाराष्ट्रात या भूमीमध्ये परत आणू आणि ती सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी सविस्तर माहिती मंत्री शेलार यांनी सभागृहासमोर ठेवली.

महत्वाच्या बातम्या:

BMC Election : मनसैनिकांची तुलना पहलगामच्या दहशतवाद्यांशी, आशिष शेलारांचा तोल कसा सुटला? की त्यामागे मुंबई महापालिकेचं समीकरण?