Pune : पुणे पोलीस (Pune Police) दलातील एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या (Suicide)  केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस दल हादरले आहे. स्वरुप जाधव असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात सध्या याबाबतचा तपास सुरु आहे.  

पुण्यातील स्वारगेट येथील पोलीस लाईनमध्ये  स्वरुप जाधव हे राहत होते. राहत्या घरात गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस याबाबतचा तपास करत आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार स्वरुप जाधव हे पोलीस शिपाई म्हणून पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत होते. जाधव हे मूळचे कोल्हापूरचे राहणारे आहेत. सध्या ते स्वारगेट येथील पोलीस लाईन मध्ये वास्तव्यास होते. आज दुपारी त्यांनी राहत्या घरातील हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.  

पोलिसांना मिळाला स्वरुप जाधव यांचा मोबाईल 

घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट पोलिसांना मिळून आलेली नाही. स्वरुप जाधव यांचा मोबाईल पोलिसांना मिळाला आहे. त्याला लॉक असल्यामुळे सध्या तरी कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, पोलिस या घटनेबाबात अधिकचा तपास करत आहेत. दरम्यान, एका पोलिस कर्मचाऱ्यानेच जीवन संपवल्यानं पुणे पोलिस दलात खळबळ माजली आहे. अचानक नेमकं असा टोकाचं पाऊल का उचललं असावं याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विविध कारणांमुळं आत्महत्या होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण जास्त वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना देखील सातत्यानं वाढत आहे. राज्यात दिवसाला सरासरी 7 ते 8 शेतकरी आत्महत्या होत असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनीआत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्या आहेत. पश्‍चिम विदर्भात 25 ,शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली होती.

महत्वाच्या बातम्या:

वारी शेवटची ठरली! धाराशिवात वारकऱ्यानं आयुष्य संपवलं; पोलिसांच्या मानसिक छळामुळे टोकाचं पाऊल, नातेवाईकांचा आरोप