कोल्हापूर : तब्बल 6 जणांच्या हत्येचा आरोप आसणाऱ्या आरोपी संतोष पोळ याच्याकडे कारागृहात पिस्तूल असल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. त्यानंतर कोल्हापुरच्या पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. मात्र ते पिस्तूल लाकडाचे असल्याची माहिती समोर येत आहे.
हा व्हिडीओ वायरल झाल्याने कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे राज्याच्या कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांनीही कोल्हापुरकडे धाव घेतली होती.
अभिनय करण्यात पटाईत असलेल्या संतोष पोळनं यावेळी सगळ्यांना वेड्यात काढल्याचं समोर आले आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनाने बॅरेकची झडती घेतली. त्यावेळी व्हिडीओत संतोष पोळच्या हातात दिसणारे ते पिस्तूल लाकडी असल्याचे निदर्शनास आले आहे.
संतोष पोळ याच्यावर वाई हत्याकांडातील 6 जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. तो मागील 3 वर्षापासून कोल्हापुरातील कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. वाई हत्याकांडाचा प्रमुख आरोपी संतोष पोळकडे व्हिडीओ चित्रीत करण्यासाठी मोबाईल कुठून आला? या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही अनुत्तरीत आहे.
संतोष पोळने वेड्यात काढले, ते पिस्तुल लाकडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Nov 2018 07:10 PM (IST)
आरोपी संतोष पोळ याच्याकडे कारागृहात पिस्तूल असल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. त्यानंतर कोल्हापुरच्या पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. मात्र ते पिस्तूल लाकडाचे असल्याची माहिती समोर येत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -