सातारा : संत ज्ञानोबांची पालखी आज लोणंदहून मार्गस्थ होऊन रात्री तरडला मुक्कामी असणार आहे. तर संत तुकोबांची पालखी बारामतीतून निघून सणसर येथे मुक्कामी असणार आहे. चांदोबाचा लिंग येते आज ज्ञानोबांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण होणार आहे.
हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात काल माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करण्यात आले. यानंतर भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे स्वागत झालं. निरास्नान झाल्यानंतर पालखी लोणंदॉच्या दिशेने मार्गस्थ झाली.
लोणंदमध्ये आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिला रिंगण सोहळ संपन्न होणार असून, यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.तर संत तुकोबांची पालखी बारामतीतून निघून सणसर येथे मुक्कामी असणार आहे.
दरम्यान, अंबाजोगाई शहरात शनिवारी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्टेडियम मैदानावर मराठवाड्यातून निघालेल्या पालख्यांमधील पाच पालख्यांचा एकत्रितरित्या रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. संततधार पावसातही विठ्ठल भक्तांनी रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला.
मराठवाड्यातील हा एकमेव अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी अंबाजोगाई व पंचक्रोशीतील महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांचे विविध मैदानी खेळ, महिलांच्या फुगडया, संत ज्ञानेश्वरांनी भिंत अशा विविध उपक्रमांचे सादरीकरण यावेळी झाले.