मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल येणार आहे. त्यापूर्वीच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यातील वाद थेट लाईव्ह कार्यक्रमात पाहायला मिळाला. 'एबीपी माझा'च्या लाईव्ह कार्यक्रमात सुषमा अंधारे यांच्या प्रतिकियेवर उत्तर देण्यास शिरसाट यांनी थेट नकार दिला. शिरसाट यांचा संताप पाहून सुषमा अंधारे यांना हसू आलं. तर, दुसरीकडे अशा विद्वानांसोबत माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता चर्चा करू शकत नाही असं म्हणत शिरसाट हे लाईव्ह कार्यक्रमातून बाहेर पडले.


नेमकं काय घडलं! 


'एबीपी माझा'च्या लाईव्ह कार्यक्रमात सुषमा अंधारे प्रतिक्रिया देत होते. याचवेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट देखील कार्यक्रमात सहभागी झाले. परंतु, अंधारे यांचा आवाज ऐकताच शिरसाट यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला. मी यांच्यावर उत्तर देणार नाही. मला यावर बोलायचं नाही. मी यांच्यासोबत बोलणार नाही. कोणाबरोबर मला चर्चेला बसवत आहेत. तुमचा काहीही विषय असेल, पण सुषमा अंधारे यांच्यासोबत मी चर्चेत बसणार नाही. मला काय बोलायचं ते मी ठरवेल. नको, नको विद्वान लोकांसोमर माझ्यासारखा कार्यकर्ता बोलू शकत नाही, असे म्हणता शिरसाट यांनी हेडफोन काढून टाकला. दरम्यान, शिरसाट यांची ही भूमिका पाहून सुषमा अंधारे यांना हसू आले. त्यामुळे शिरसाट आणखी संतापले अन् म्हणाले पहा हे असं असतं...असे म्हणत अखेर शिरसाट कार्यक्रमातून बाहेर पडले. 


शरमिंदे लोकं पुढे येत नसतात.


शिरसाट हे लाईव्ह कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. “सत्त्यासमोर येण्यासाठी भलेभले लोक घाबरत असतात. सत्याची ताकद आणि सत्याची धग सहन होत नसते. मी खूप शांतपणे माझी मांडली केली. मी कुणावर आगपाखड करत नाही आणि करणार देखील नाही. आजचा निकाल काहीही लागला तरीही मी आगपाखड करणार नाही. तरीही असत्याला नेहमी भीती वाटत असते. असत्य घाबरत असते. कारण असत्य बऱ्याच कारणांनी शरमिंदा झालेला  असतो. त्यामुळे शरमिंदे लोकं पुढे येत नसतात. त्यामुळे मला याबाबत फार काही वाटत नाही. आज काही जो निकाल येईल तो स्वीकारून पुढच्या निवडणुकांसाठी पुढे जाण्याची आमची तयारी असल्याच अंधारे म्हणाल्या आहेत. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


आमदार अपात्रतेचा निर्णय किती वाजता देणार? कळवायला उशीर का?, ठाकरे गटाचे वकिल असीम सरोदेंचा सवाल