मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे हे भाजपच्या हातात आहे. इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, दोन वेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात यालाच लोकशाही म्हणतात. भारतरत्नं कोणाला द्यायचं हे भाजपच्या हातात आहे त्यांनी द्यावं. मात्र, इतिहासावर किती दिवस बोलणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस राज्याचा विकास करण्यासाठी एकत्र आली आहे. दरम्यान, आजची अर्थव्यवस्था आणि जीडीपी पाहून ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य दिले त्यांना अभिमान वाटेल की त्यांना लाज वाटेल हा विचार करणेचे गरजेचे आहे. सध्या इतिहासाकडून प्रेरणा घेणे गरजेच आहे. देशातील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.
Aditya Thackeray | किती दिवस इतिहासात रमणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल | ABP Majha


मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर मुंबईत रात्रजीवन (नाईट लाईफ) सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. या निर्णयावर प्रतिक्रया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई नाईट लाईफविषयी माहिती न घेता विरोधक बोलत आहेत. आपण जे सुरु करतोय ते नाईट लाईफ नाही, मुंबई 24 तास ही त्यामागची कल्पना आहे. याला नाईट लाईफ किंवा मुंबई 24 तास असे देखील म्हणता येईल. लंडनची नाईटटाईम इकॉनॉमी 5 बिलीयन पाऊंडस् आहे. हॉटेल्स, मॉल खुले राहिले तर बेस्ट, ओला, उबर, टॅक्सी सुरु राहतील. मुंबईत रोजगांर वाढवण्याच्या दृष्टीने 'मुंबई 24 तास' सुरु ठेवणं ही संकल्पना आहे. मॉल, मिल कपाऊंड परिसरात कुठेही रहिवासी परिसर नाही. त्यामुळे, नाईट लाईफचा स्थानिक नागरिकांना याचा त्रास होणार नाही

संबंधित बातम्या :

भाजपमध्ये आलेल्या नेत्यांमुळं पक्षाला फायदाच झाला, चंद्रकांत पाटील यांचं घूमजाव

सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा; राऊतांच्या वक्तव्यानं शिवसेना अडचणीत?