मुंबई : भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण पाठवले आहे. परंतु शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. याचवेळी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी संजय राऊतदेखील दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेबाबत अगोदर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बोलणे होईल. त्यानंतर संजय राऊत यांच्यातदेखील सत्तास्थापनेबाबत खलबतं होतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान संजय राऊत सोनिया गांधी यांचीदेखील भेट घेण्याची शक्यता आहे.


संजय राऊत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा घडवून आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याकडे पाठिंबा देण्याची मागणी करतील.


राज्यात कोणत्याही पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी 144 आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. तर त्यांच्याकडे 8 अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे 64 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेनेला अधिक 80 आमदारांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ आहे.


सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपला संजय राऊतांचा टोला



पाहा भाजपची नेमकी भूमिका काय?



मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार! शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं विधान