मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक महिना चार दिवस झाल्यानंतर अखेर महाराष्ट्राला पर्मनन्ट मुख्यमंत्री मिळाला आहे. राज्याचे 29 वे तर शिवसेनेकडून तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला राज्यासह देशभरातील अनेक बडे नेते उपस्थित होते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मित्र देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील हजर होते. त्यामुळे, शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील या दोन्ही नेत्यांचे आभार मानले आहेत.

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नाही. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक आणि ट्विटरवरुन यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत खूप मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.


दरम्यान, भाजप अजूनही संजय राऊत यांच्या निशाण्यावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांचे आभार मानल्यानंतर संजय राऊत यांनी अजून एक ट्वीट केले. या ट्विटद्वारे त्यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे. राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्रात विरोधी पक्षच राहणार नाही, अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून पहिलं टिकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या किमान समान कार्यक्रमावर फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. फडणवीस यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे की, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!


फडणवीस मुंबईत घराच्या शोधात, 'वर्षा' बंगला सोडणार 



पाहा पत्रकार परिषदेत संजय राऊत काय म्हणाले?



'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'...उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची शपथ | ABP Majha