Sanjay Raut Press Conferance : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) ही पत्रकार परिषद पार पडली. आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांच्या निशाण्यावर भाजपचे नेते आहेत. याआधीही संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केला होता. तसेच, भाजप नेत्यांकडून केंद्रीय यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापरावरही संजय राऊतांनी बोट ठेवलं होतं. मागच्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्यांना (Neil Somaiya) तुरुंगात टाकणार असल्याचंही राऊत म्हणाले होते. पुढच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करणार असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांच्या निशाण्यावर भाजपचे नेते आहेत.  आजच्या पत्रकार परिषदेत ED ची खंडणीखोरी, IT ची भानामती ते मोदींना पत्र, संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे


1) शिवसेनेलाही धाडी टाकण्याचा अधिकार  आहे : शिवसेना नेते खासदार संजय राऊत  



शिवसेनेलाही धाडी टाकण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये फक्त धाडी कशा पडत आहेत? असा प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सरकार पाडण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी ईडीवर केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनाही अधिकार आहेत. पुढच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करणार 


2)आयटी आणि ईडीला आतापर्यंत आम्ही 50 जणांविरोधात पुरावे दिले : संजय राऊत



आयटी आणि ईडीला आतापर्यंत आम्ही 50 जणांविरोधात पुरावे दिले आहेत. परंतु, ईडीकडून फक्त सरकार पाडण्याच्या हेतूने महाराष्ट्रात धाडी टाकल्या जात आहेत. ईडीने आतापर्यंत सर्वात जास्त धाडी महाराष्ट्रात टाकल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.  


3)आयकर खात्याच्या भानामतीमागे कोण? याचा पर्दाफाश करणार


संजय राऊत म्हणाले,  आज मुंबईत धाडीवर धाडी पडत आहे. आमच्या घरात महाराष्ट्रात जर कोणी घुसत असेल तर शिवसेनेला देखील दुसऱ्यांच्या घरी धाडी टाकण्याचा अधिकार आहे.  देशात सर्वाधिक ईडीच्या कारवाया  म्हाराष्ट्रात झाल्या आहे.  महाविकास आघाडीच्या 14  प्रमुख नेत्यांवर   कारवाई झाली मात्र भाजपच्या लोकांवर मात्र कारवाई का होत नाही. ईडीला आणि आयटीला आतापर्यंत आम्ही 50 जणांची यादी पुराव्यासकट दिली आहे, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचा खुलासा लवकरच आम्ही करणार आहे. 


4)ईडी आणि ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन 


ईडी आणि ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन बनले आहे.  याबाबत मी 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे.  या पत्रामध्ये  स्वच्छ भारत अभियानामध्ये नुसता कचरा नाही तर भ्रष्टाचार सुद्धा साफ करायचा आहे. ज्या ईडीला तुम्ही सगळ्यांच्या विरोधात लावलं आहे. या संदर्भात दहा भाग मी त्यांना देणार आहे. हा आजचा एक भाग  असल्याचे संजय राऊत म्हणाले. 


5)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 13 पानी पत्र लिहिलं


ईडी आणि ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन बनले आहे.  याबाबत मी 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे.  या पत्रामध्ये  स्वच्छ भारत अभियानामध्ये नुसता कचरा नाही तर भ्रष्टाचार सुद्धा साफ करायचा आहे. ज्या ईडी ला तुम्ही सगळ्यांच्या विरोधात लावलं आहे. या संदर्भात दहा भाग मी त्यांना देणार आहे. हा आजचा एक भाग आहे.


6)किरीट सोमय्या भाजपचे वसुली एजंट : संजय राऊत


Sanjay Raut : किरीट सोमय्या भाजपचे वसुली एजंट आहेत. भाजपकडून ईडीच्या अधिकाऱ्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं जात आहे. ईडिकडून व्यावसायिक आणि बिल्डरांना धमकावले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 



7)जितेंद्र नवलानी हे ईडीचे रॅकेट चालवतात : संजय राऊत

जितेंद्र नवलानी हे ईडीचे रॅकेट चालवतात. ईडीने दिवाण हाऊसिंगचा तपास सुरू केला. हा तपास सुरू केल्यानंतर दिवाण हाऊसिंगकडून अधिकाऱ्यांच्या नावावर 25 कोटी रूपये ट्रान्सफर केले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.


8)चार ईडी अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार : संजय राऊत



Sanjay Raut : चार ईडी अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करतील, जितेंद्र नवलानी रॅकेट विरोधात खंडणीची तक्रार दाखल केली करणार आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ईडीचे काही अधिकारी तुरूंगात जातील ; संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. शंभरहून जास्त बांधकाम व्यावसायिकांकडून घेतली खंडणी


9)पीएमसी बॅंक घोटाळ्याशी किरीट सोमय्या यांचा काय संबंध? संजय राऊत



पीएमसी बॅंक घोटाळ्याशी किरीट सोमय्या यांचा काय संबंध आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.


10)किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र तुरूंगात जातील : संजय राऊत



 किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र तुरूंगात जातील. नील सोमय्या हे वाधवान यांच्यासोबत निकॉन इन्फ्रा कंपनीचे बिझनेस पार्टनर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.  


संबधित बातम्या :