Sanjay Raut Scathing Attack on RSS and Mohan Bhagwat: सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं. हे सलमान खानच स्वागत होतं की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे? हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं, अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. 

Continues below advertisement

क्या करेंगे भाई जाना पडता है

संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला की, सलमान खान सारखे मोठे बॉलिवूड स्टार संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते का? त्यांनी खोचक प्रश्न विचारला की, "सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का? त्यांनी पुढे म्हटले की, तिथे आपापसात चर्चा सुरू असताना त्यांच्या कानावर एक गमतीशीर गोष्ट आली, ती म्हणजे, "क्या करेंगे भाई जाना पडता है". राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने हिंदू मुसलमान द्वेष आणि सूडपूर्ण प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो त्याच्यामध्ये संघही सामील आहे कारण मोदी फडणवीस अमित शहा व इतर सगळे लोक द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत. सध्या सत्ता आहे उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक (कलाकार) परत आपल्या व्यासपीठावर येतील का हा एक फार गमतीचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. 

हिंदूंची हत्या करण्याचे इनाम आहे का? 

त्यांनी सांगितले की, बांगलादेशमध्ये गेल्या एक वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहेत त्यामध्ये आतापर्यंत आमची 450 मंदिर पाडली, हजारो हिंदू जनतेच्या घरांना आगी लावल्या आणि जवळजवळ 230 ते 240 हिंदूंची हत्या झाली. यावर देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अक्षर काढत नाहीत. भारत सरकारन हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केली आहे. देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कतली करणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होत असल्याचे ते म्हणाले. हिंदूंची हत्या करण्याचा हा इनाम आहे का? हे ढोंग असल्याची टीका त्यांनी केली. 

Continues below advertisement

मुंबई 'बांगलादेश मुक्त' करण्यावरून महापौरांना टोला

राऊत म्हणाले, बांगलादेशी मुक्त करण्याच ते जे काही त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हाती नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. घुसखोर बांगलादेशांना मुंबई काय देशातून हाकला पाहिजे ही आमची भूमिका आहे पण त्याचे राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं असल्याचा टोला त्यांनी नुतन महापौरांना लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या