मुंबई :  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा (Marathi Classical Language)  मिळाला त्याचा आनंद आहे. मराठी भाषेचा सन्मान वाढला आहे.  गेल्या 15 -20 वर्षात शिवसेनेसह मराठी खासदारांनीही याचा पाठपुरवठा केला.  भाषेला प्रतिष्ठा मिळाली आता माणसाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.  एमआयएमच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले,  आघाडीत आधीच भरपूर पक्ष झालेत, नव्या पक्षाला 288  जागा देणं शिवसेनेला कठीण दिसतंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.


संजय राऊत म्हणाले,  मराठी माणसाला भाषेला प्रतिष्ठा मिळाली पण मराठी माणसाला प्रतिष्ठा देण्याचा काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. ज्याप्रमाणे मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली सरकारी पातळीवर त्याच पद्धतीने माझं केंद्र सरकारला  आवाहान आहे  की,  मराठी माणसाचा रोजगार जो  अन्य राज्यात पळवून नेत आहे तो  कृपा करून थांबवा.  मराठी भाषेबरोबर मराठी माणसाचा हक्काचा रोजगार सुद्धा त्याला आपला महाराष्ट्रात मिळू द्या.  त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 55 वर्षापूर्वी आंदोलन उभा केला होता.  भाषेला प्रतिष्ठा मिळाली माणसांना प्रतिष्ठान मिळाली पाहिजे. जिथे मराठी बोलली जाते त्या महाराष्ट्राची लूट करून भाषेला प्रतिष्ठा देणे हे  गंभीर आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्राची बदनामी देशात सुरू आहे ती  गद्दारी, बेईमानी पाहता या राज्यातील फक्त भाषेला दर्जा देऊन हा कलंक पुसला जाणार नाही पण नक्कीच आम्ही आज आनंदी आहे.


लोकसभेच्या पराभावाची भरपाई म्हणून अभिजात दर्जा दिला असेल तर आम्हाल भीक नको : संजय राऊत


अभिजात भाषेच्या श्रेयवादावर बोलताना संजय राऊत म्हणाले, श्रेयवादाची लढाई नक्की होणार कालच सांगितलं.  श्रेय उपटण्याचे प्रकार सुरू होतील, मोदी आहेतच.  महाराष्ट्रात बाजूलाच आहेत प्रधानमंत्री आपले आहेत.  श्रेय कोण कशाला घेईल इथे प्रत्येकाचं योगदान या आजच्या निर्णयात आहे . आता फक्त आहे निवडणुका आहेत महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे.  लोकसभेत दारुण पराभव झालेला आहे.  महाराष्ट्रात त्याची भरपाई करण्यासाठी जर तुम्ही केला असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही. मराठी भाषा ही महानच आहे. मेहरबानीची मराठी भाषेला गरज नाही.  ही  शूर-वीरांची,  मर्दांची , संतांची भाषा आहे.  महाराष्ट्रात ही सगळी परंपरा शौर्यांची आणि संतांची फार महान आहे .


नव्या पक्षाला 288 मध्ये जागा देणं शिवसेनेला कठीण दिसतंय : संजय राऊत


एमआयएमच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले,  शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे.  आपल्या आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेले आहेत.  काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष आहे. त्याशिवाय कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग, शेतकरी कामगार पक्ष, मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणारे समाजवादी पार्टी आहे.  रिपब्लिकन पक्षाचे काही संघटना आपल्या आघाडीमध्ये आहेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणे 288 मध्ये आम्हाला कठीण दिसत आहे.  पवार साहेबांनी त्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.


Sanjay Raut Mumbai : श्रेय उपटण्याचे प्रकार आता सुरू होतील, मोदी आहेतच... संजय राऊतांचा टोला



 


हे ही वाचा :


महाविकास आघाडीत एका-एका जागेसाठी रस्सीखेच; MIM ला हव्यात 28 जागा; काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलेला प्रस्ताव एबीपी माझाच्या हाती