मुंबई : संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट आहेत, त्यांनी फार बोलू नये असा टोला अपक्ष आमदार रवी राणा यांनी लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील असा विश्वास त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केला. ओल्या दुष्काळासंदर्भात राणा दांपत्यांनी मुंबईत राज्यपालांची भेट घेतली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी विनंती त्यांनी या वेळी केली.

रवी राणा म्हणाले, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील. शिवसेना ही आडकाठी करत आहे. युती मध्ये शिवसेना लढली म्हणून त्यांच्या तेवढ्या तरी जागा तरी आल्या आणि सेनेचेच 20 ते 25 आमदार माझ्या आणि मुख्यमंत्री यांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेने जर त्यांची आडीबाजी सोडली नाही तर याच मोठं नुकसान शिवसेनेलाच होईल. गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्र्यांनी जी काम केली ते पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच झाले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या आहेत त्या भाजपामुळे मिळाल्या आहेत. शिवसेना महायुतीमध्ये नसती स्वबळावर लढली असती शिवसेनेला 25 जागांवर समाधान मानावे लागले असते.

उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात जी चर्चा झाली त्यातून युतीची घोषणा करण्यात आली आहे. तसंच रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.

 Navneet Rana | सेनेचे 20-25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, अपक्ष आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा | ABP Majha




मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर थोड्याच दिवसात शिवसेनेचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा त्यांनी या वेळी केला. शिवसेनेची सध्या मुजोरी चालली आहे, ती थांबवली पाहिजे. शिवसेनेकडून निकालानंतर अशा प्रकारची विधान म्हणजे हा राज्यातील जनतेचा अपमान आहे. जनता शिवसेनेला जनता योग्य वेळी धडा शिकवेल.