Sanjay Raut : पराभवाला घाबरल्यामुळं महायुती लोकशाही विरोधात मोठं कारस्थान करत आहे. त्यामुळं महायुतीवाल्यांना आम्ही लफांगे म्हणतो, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. काल मविआचे नेते निवडणूक आयोगाला भेटले होते. 150 मतदारसंघात त्यांनी ठरवलेले आहे की, एक अँप आहे त्यात 10 हजार मतं काढून टाकायची आणि बोगस मतदार टाकायचे आणि गोंधळ करायचा हे काम केलं जात असल्याचे राऊत म्हणाले. याचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत.यावर तोडगा निघावा नाहीतर विराट मोर्चा आम्हाला काढावा लागेल असंही राऊत म्हणाले.
निवडणूक आयोग मोदी यांच्या पायाशी बसला आहे का?
आम्ही या मतदार यादीबद्दल निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटलो आहोत. पारदर्शक निवडणूक व्हाव्यात ही आमची भूमिका असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. पण ही पारदर्शकता निवडणुकीत दिसत नाही असेही पटोले म्हणाले. निवडणूक आयोग मोदी यांच्या पायाशी बसला आहे का? लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम आम्ही कदापी होऊ देणार नाही असेही पटोले म्हणाले. हे पाप निवडणूक आयोगाने थांबवला पाहिजे असेही ते म्हणाले. शिर्डीमधील लोणी गावात 2844 मतं लोकसभेनंतर वाढवण्यात आली आहेत. यामध्ये मुस्लीम, बौद्ध यांची मत कमी करण्याचा काम हे करत असल्याचे पटोले म्हणाले. मतदारांनी सतर्क झालं पाहिजे. आपले मतदान बरोबर आहेत की नाही हे तपासालं पाहिजे असंही पटोले म्हणाले.
निवडणूक आयोगाचे काही अधिकारी भाजपच्या आदेशाने काम करतात
निवडणूक आयोगाचे काही अधिकारी भाजपच्या आदेशाने काम करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. 10 ते 15 हजार मतदारांची नावं कमी कारण्याचा काम हे करत आहेत. बाहेर राज्यातील मतदार या मतदार यादीत टाकले जात आहेत. एका दिवसात 2844 मतदार कसे वाढतात? असा सवाल पटोले यांनी केला आहे. महायुती सरकारला वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाने मदत केली पाहिजे, नाहीतर आम्ही या विरोधात मोर्चा काढू असेही पटोले म्हणाले.
निवडणूक आयोग हे सरकाराची कतपुतळी : जितेंद्र आव्हाड
शिर्डी, चंद्रपूर, अकोला, नागपूर, चिमूर, धामणगाव या ठिकाणच्या मतदार याद्यांमध्ये गोंधळ केला असल्याचे मत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोग हे सरकाराची कतपुतळी झाले आहेत. हा धक्कादायक प्रकार लोकशाही संपवाणारा आहे. मतदार याद्या चेक करा असे आव्हाड म्हणाले. भाजप कट कारस्थान करून पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या मित्र पक्षांना सुद्धा याची कल्पना नाही, असे आव्हाड म्हणाले.
मतदार यादीत गोंधळ असलेले मतदारसंघ कोणते?
शिर्डी
चंद्रपूर
आर्वी
कामठी
कोथरूड
गोंदिया
अकोला ईस्ट
चिखली
नागपूर
कणकवली
खामगाव
चिमूर
धामणगाव