मुंबई :  यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता आहे आणि त्याला कारण आहे ते म्हणजे नवाब मलिक (Nawab Malik). मलिक जेव्हा त्या सत्ताधारी बाकावर बसले तेव्हा विरोधकांकडून टीकेची झोड उठली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  प्रफुल्ल पटेलांनी मलिकांना पेढा भरवतानाचा फोटो ट्वीट केलाय. तसंच मलिकांपेक्षाही भयंकर अपराधाचे आरोप असलेले मंत्री कॅबिनेटमध्ये' येतात अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली. प्रफुल्ल पटेल चालतात पण मलिक का चालत नाहीत असा सवाल राऊतांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. 


मुख्यमंत्र्यांनी केलेल्या साफसफाईवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.  मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातील मंत्र्यांची सफाई करावी, भ्रष्टाचाराची सफाई करावी, असे वक्तव्य संजय राऊत म्हणाले.  सर्व नाटक बंद केली पाहिजे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची सफाई केली पाहिजे.  मुंबई महापालिका निवडणुका आपण घेत नाही हे महापालिकेचे, नगरसेवकांचे काम आहे. ठाण्यामध्ये ,पुणे ,नाशिक 14 महानगरपालिका निवडणुका घ्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे सोंग, ढोंग करण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही ठाण्यातील नगरसेवक प्रमाणे आहे 


महाराष्ट्रात घाशीराम कोतवालांचं राज्य : राऊत


राज्यात घाशीराम कोतवालांचं राज्य, तीन घाशीराम कोतवाल राज्य करतायत, खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. घाशीराम कोतवाल महाराष्ट्रात नाटक खूप गाजलं आहे. ती एक विकृती होती . आज महाराष्ट्रात घाशीराम कोतवाल राज्य आहे, असे संजय राऊत म्हणाले. 


 






ड्रग्ज रॅकेट प्रकरणात दोन मंत्री सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा : राऊत


ललित पाटील प्रकरणातल्या मंत्र्यांवर कारवाई करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलीय. ड्रग्ज रॅकेट प्रकरणात दोन मंत्री सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा असा आरोप त्यांनी केले आहे. ललित पाटीलला वर्षभर ससूनमध्ये ठेवण्यात आलं. ललित पाटीलचे  ससूनमध्ये साम्राज्य होते त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम या दोघांनी केलं.  पोलिसांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे रवींद्र धगेकर यांनी  सांगितले आहे. किरकोळ लहान मासे का पकडत आहेत? असा सवाल राऊतांनी केला आहे


हे ही वाचा :


राजकीय ढोंगीपणाच्या 'नकाब'चा 'जवाब' द्यावाच लागेल, मनसेचा सरकारला इशारा