Sanjay Raut : राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन शिवेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांच्यासोबत एका गंभीर गुन्हे असलेल्या असलेल्या आरोपीनं सेल्फी घेतला आहे. हा फोटो शेअर कर राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केलीय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यालाच म्हणतात गुंडांनी गुंडासाठी चालवलेलं राज्य, असं ट्वीट राऊतांनी केलंय. तुमच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे बाळराजे म्हणजे श्रीकांत शिंदे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा अशी मागणी देखील राऊतांनी फडणवीसांकडे केलीय.
ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणाले राऊत?
संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. गृहमंत्री देवेंद्र जीयालाच म्हणतात गुंडांनी, गुंडांसाठी चालवलेले राज्य. नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत. हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच. हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा अशी मागणी संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केलीय.
सध्या राज्यात गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संजय राऊत म्हणालेत. पुण्यात अट्टल गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या झाली. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेला गोळीबार केल्याची घटना आहे. अशा घटना ताज्या असतानाच दहिसरमध्ये शिववसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या रडारवर आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी विरोधकांकडून केली जातेय. दरम्याव, या गुन्हेगारीच्या घटनांवरुन राज्यातील वातानरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. कारण विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायेत.
महत्वाच्या बातम्या: