Sanjay Raut on RSS: स्वातंत्र्य लढामध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं, हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हे महान राष्ट्रकार्य संघाच्या वतीने (Rashtriya Swayamsevak Sangh) झालं, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut criticism) यांनी केली. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांना (Gandhi Ambedkar RSS) संघाशी जोडण्याच्या प्रयत्नावर राऊत म्हणाले की, "गांधी किंवा डॉक्टर आंबेडकर यांनी कधी संघाचं समर्थन केलं नव्हतं. संघ हा विष आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते". त्यांनी पुढे कमलाताई गवई यांना संघाच्या मेळाव्यात बोलावून संघ आणि आंबेडकरी विचारांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. दसरा मेळाव्यांच्या परंपरेबद्दल बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात दोनच दसरा मेळावा होतात, एक नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि दुसरा मुंबईत शिवसेनेचा. 

Continues below advertisement


त्यांनी प्रधानमंत्री राज्यपाल नेमलेले आहेत (Sanjay Raut on RSS) 


संजय राऊत म्हणाले की, संघाचा दसरा मेळावा नागपूरला होतो आणि तो एक परंपरा आहे. 100 वर्ष संघाला होत आहेत, आज त्यांच्या हातामध्ये सत्ता या देशाची आहे. त्यांनी प्रधानमंत्री नेमले आहेत, त्यांनी इतर काही राज्यपाल नेमले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या संचालनाला एक सत्तेच तेज असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संघाच्या शस्त्रपूजनावर बोलताना ते म्हणाले की, "त्यांच्या हातात काठ्या असतात आणि काठीच्या माध्यमातून देशाचं रक्षण करण्याची त्यांची मोठी परंपरा आहे". याउलट, बाळासाहेब ठाकरेंची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray views on RSS) म्हणायचे की आम्हाला AK-47 हव्या, काठ्या-लाठ्यांना तेल लावून देशाचे संरक्षण होणार नाही. शिवसैनिकांच्या हातामध्ये AK-47 आली तर जम्मू-काश्मीरसह देशाच्या सीमा आम्ही सुरक्षित करण्यासाठी बलिदानाला तयार राहू". 


राऊत यांनी संघाच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले, "नक्की संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे. त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे, त्याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही. आमची पण त्यांना सहानुभूती एकेकाळी होती. पण जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात असतं, राष्ट्राविषयी कठोरपणे सत्ताधाऱ्यांविषयी भूमिका घ्यायच्या असतात, तेव्हा संघाने त्या भूमिका घेतलेल्या नाहीत".



इतर महत्वाच्या बातम्या