Sangli News : मुंबईवरील 26/11 मधील दहशतवादी हल्ल्यामध्ये जीवाची बाजू लावून रक्षण करणाऱ्या शहीद पोलिस जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगली ते मुंबई दौडचे आयोजन करण्यात आले आहे. 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत ही दौड होईल. सांगलीमधील शहीद अशोक कामटे फौंडेशनकडून या दौडचे आयोजन करण्यात आले आहे. शहीदांना स्मरून गेल्या 12 वर्षांपासून सांगलीमध्ये इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. 


सांगली ते मुंबई अशी 470 किमीची दौडला उद्या सांगलीतून दौडला प्रारंभ होईल. मशाल व तिरंगा हाती घेत 25 धावपटू सहभागी होतील. सांगली, इस्लामपूर, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल, नवी मुंबई अशा मार्गे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ही दौड 26 नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे. मातृभूमीचे रक्षण करून स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या पराक्रमाची व त्यागाची गाथा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावी, हा या दौडचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.


सांगलीत मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता शहीद अशोक कामटे चौकातून स्थानिक शहीद दौडला सुरुवात होणार होईल. राम मंदिर येथे दौडचा समारोप होणार आहे. सांगलीतील दौडमध्ये मुंबईचे अपर पोलीस महासंचालक रवींद्रकुमार सिंगल सहभागी होणार आहेत. यावेळी स्थानिक धावपटूंचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईची शहीद दौड सुरू होईल. 


26/11 मुबंईवरील भ्याड हल्ला


26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबईवर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197 जण ठार झाले होते. 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले होते व अजमल कसाबला तुकाराम ओंबळे यांनी जिवंत पकडले होते. पकडला गेलेला एकमेव दहशतवादी कसाब हा 26नोव्हेंबरला जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.


इतर महत्वाच्या बातम्या